[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Whatapp Update : आजकाल सगळ्याच वयातील माणसं Whatapp वापरताना आपल्याला (Whatapp Update) दिसतात. मग ते काम ऑफिसचे असो, लहान मुलांचा अभ्यास असो किंवा मित्रांसोबत व्हिडिओ कॉल वर बोलणं असो… व्हॉट्सॲप ही सगळी कामे झटक्यात करून देतो. अशातच ऑफिसच्या कामासाठी आणि कौटुंबिक कामासाठी वेगळे whatsapp अकाऊंट वापरत असाल तर डुअल व्हॉट्सॲप वापरणे योग्य ठरणार नाही. दोन ॲप तुमच्या फोनमध्ये असलेत तर फोनचे स्टोअरेज वाढणारच आणि सोबतच फोन हॅंगदेखील होण्याची शक्यता असते. मात्र तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या या समस्येवर आता पर्याय निघाला आहे. आता तुम्ही एकच व्हॉट्सॲपमध्ये अनेक अकाउंट वापरू शकता. अर्थात आता तुम्हाला दुसरी कोणती नवीन ॲप वापरण्याची गरज भासणार नाही. एकाच व्हॉट्सॲपमध्ये तुम्ही अनेक अकाउंट कसे वापरु शकता? जाणून घ्या…
या विषयावर बोलायचं झाल्यास व्हॉट्सॲपचं हे फिचर आत्ताच आपल्यासमोर आला आहे. मात्र तरीसुद्धा याबद्दल अनेक युजर्सना काहीच माहिती नाही. जर तुमची सुद्धा एकापेक्षा अनेक नंबर वरून व्हॉट्सॲप वापरण्याची ईच्छा असेल तर आज आपण याच सगळ्या प्रोसेसर बद्दल जाणून घेणार आहोत. यामध्ये तुमचा फोन कोणता आहे या गोष्टीमुळे कोणताही फरक पडणार नाही. कारण IOS किंवा Android कोणत्याही युजरला काळजी करण्याची काहीही गरज नाही. म्हणजेच दोन्ही युजर या फिचरचा फायदा मिळवू शकतात.
फॉलो करा या सोप्या स्टेप्स
Step -1 : व्हॉट्सॲप ॲप ओपन करा. आता टॉप-राइट साइडला 3 डॉट्ह तुम्हाला दिसतील. त्यावर क्लिक करा.
Step -2 :आता सेटिंग ऑप्शनला सिलेक्ट करा.
Step -3 : देण्यात आलेल्या ऑप्शनमध्ये असलेल्या ‘अकाउंट’ वर क्लिक करा.
Step -4 : आता ‘ Add account’ वर टॅप करा. इथे तुम्ही एकापेक्षा जास्त नंबर वरून व्हाटॉसॲप लॉगिन करू शकतात.
लवकरच समोर येतील हे नवीन फिचर्स
चर्चेत असणाऱ्या माहितीनुसार व्हॉट्सॲप आता लवकरच नवीन अपडेट आणणार आहे. येत्या काळात व्हॉट्सॲपचा चॅट बॅकअप करण्यासाठी तुम्हाला गुगलला पेमेंट करावा लागेल. या फिचरमध्ये व्हॉट्सॲप चॅट बॅकअप करणारे जे युजर आहेत त्यांना One Google चे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. याशिवाय गुगल ब्रॉडकास्ट चॅनेलला व्हेरिफाय झाल्यावर ब्लू बॅज घेऊ शकतात.
इतर महत्वाची बातमी-
Great Republic Day Sale 2024 : Motorola razr 40 ultra फोनवर थेट 50 हजारपर्यंतची सूट; Republic Day Sale मध्ये फोनवर तुफान ऑफर्स
[ad_2]