IND Vs ENG India To Pick Between KS Bharat Or Dhruv Jurel For Wicketkeeper Role Says Rahul Dravid

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs ENG 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला (IND vs ENG Test) सुरुवात होणार आहे. उद्या हैदराबाद  (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) येथे पहिला कसोटी सामना सुरु होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा विकेटकिपर कोण असेल? याबाबत चाहत्यांना प्रश्न पडला आहे. केएल राहुल विकेटकिपिंग करणार नसल्याचे भारताचा कोच राहुल द्रविड (Rahul dravid) यांनी मंगळवारी स्पष्ट केले. त्यानंतर केएस भरत (KS Bharat) आणि ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. या दोघांपैकी एका जणाला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. केएस भरत याचा दावा अधिक मजबूत वाटतोय. भरत याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्या तुलनेत ध्रुव जुरेल नवखा आहे. त्यामुळे केएस भरत याला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. 

राहुल द्रविड काय म्हणाला होता ?

संघात केएल राहुल, केएस भरत, ध्रुव जुरेल असे तीन विकेटकिपर आहेत. कसोटी सामन्यात राहुल विकेटकिपर म्हणून नाही, तर फक्त फलंदाज म्हणूनच खेळणार आहे. विकेटकिपरची निवड अन्य दोघांमधूनच करण्यात येईल असे राहुल द्रविड यांनी मंगळवारी स्पष्ट सांगितलं. भारतातील फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टी आणि जडेजा, अश्विनसारखे गोलंदाज लक्षात घेतले, तर त्यांच्यासमोर स्पेशल विकेटकिपर हवा, असा मुद्दाही द्रविड यांनी उपस्थित केला.  

रजत पाटीदारला संधी – 

Cricbuzz च्या रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने विराट कोहलीच्या जागी पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी आरसीबीच्या रजत पाटीदार (Rajat Patidar) याला स्थान दिले आहे. भारताचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यातून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली. त्याजागी आता रजत पाटीदार याला स्थान देण्यात आलेय. त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता धुसूरच आहे. 

इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया  –

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान. 

पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ – 

बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स एंडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक –  

पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)

आणखी वाचा :

मोठी बातमी! विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची घोषणा, आरसीबीच्या खेळाडूला मिळाली संधी!

[ad_2]

Related posts