[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना समालोचन करणारा पॉन्टिंग म्हणाला, भारताने फक्त पहिल्या डावासाठी संघ निवडला आहे. ही त्यांची मोठी चूक आहे. अश्विन हा जडेजापेक्षा सर्वोत्तम गोलंदाज आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या संघात चार डावखुरे फलंदाज आहेत. अश्विन हा अशा फलंदाजांसाठी घातक गोलंदाज ठरू शकतो.
मला धक्का बसला की त्यांनी अश्विनला बाहेर बसवले आहे. ऑस्ट्रेलियाकडे डाव्या हाताने खेळणारे फलंदाज जास्त आहेत. माझ्या मनात याबद्दल कोणतीही शंका नाही की जडेजा पेक्षा अश्विन सर्वोत्तम आहे. अश्विननंतर जडेजाने सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे हे देखील खरे आहे. मोठा निर्णय ठाकूर आणि उमेश यादव यांच्यात घ्यायचा होता. यात ठाकूरची बाजू अधिक मजबूत होती. कारण यामुळे शमी आणि सिराजला थोडा ब्रेक देता येऊ शकतो.
पॉन्टिंगने शमी, सिराज, ठाकूर आणि यादव यांच्या गोलंदाजीवर देखील टीका केली. सिराजने चांगली गोलंदाजी केली आणि उस्मान ख्वाजाला शून्यावर बाद केले. पण तेवढे पुरेसे नव्हते. जर भारताने खरंच चांगली गोलंदाजी केली असती तर ६० टक्के फुलर लेंथ असत्या तर २० टक्के गुड लेंथ टाकल्या असत्या.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी ८५ षटकात ३ बाद ३२७ धावा केल्या होत्या. आता दुसऱ्या दिवशी भारताने सुरुवातीच्या सत्रात हेड आणि कॅमरून ग्रीन यांना माघारी पाठवून चांगली सुरुवात केली आहे.
[ad_2]