[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
India vs England first test Hyderabad हैदराबाद : भारताने पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडचा (India vs England) पहिला डाव पहिल्याच दिवशी 246 धावांवर गुंडाळला. या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरश: घेरुन ठेवलं. भारताकडून रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि आर अश्विनने (R Ashwin) प्रत्येकी 3 तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा केल्या.
यानंतर भारताकडून सलामीसाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयस्वाल ( Yashasvi Jaiswal) मैदानात उतरले. या दोघांनी आपल्या स्टाईलमध्ये धुलाईला सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या 10 ओव्हरमध्ये 65 धावांचा टप्पा पार केला. एकीकडे यशस्वी जयस्वालने अर्धशतक पूर्ण केलं, तर दुसरीकडे रोहित शर्मा त्याला साथ देत सावध खेळत होता. मात्र एक फटका खेळण्याच्या नादात लीचच्या गोलंदाजीवर रोहित 24 धावा करुन माघारी परतला. रोहित बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या 80 होती.
भारतीय फिरकीसमोर इंग्लंडची गिरकी (England Cricket inning)
त्याआधी भारतीय गोलंदाजांनी धडाकेबाज गोलंदाजी केली. इंग्लंडकडून झॅक क्रॉली (Zak Crawley ) आणि बेन डकेत (Ben Duckett) यांनी सावध सुरुवात केली. मात्र आर अश्विनने डकेतला पायचित करुन भारताला 55 धावांवर पहिलं यश मिळवून दिलं. डकेतने 39 चेंडूत 35 धावा केल्या.त्यानंतर मग लगेचच रवींद्र जाडेजाने ओली पोपला 1 धावेवर बाद केलं. मग अश्विननेच दुसरा सलामीवीर क्रॉलीचा काटा काढला. क्रॉलीला सिराजकरवी झेलबाद केलं. त्याने 20 धावा केल्या.
क्रॉली बाद झाला त्यावेळी इंग्लंडची धावसंख्या 3 बाद 60 अशी होती.
यानंतर मग ज्यो रुट आणि जॉनी बेअस्ट्रो यांनी डाव सांभाळला. दोघांनी संघाला 100 धावांचा टप्पा ओलांडून दिला. एकीकडे ही जोडी जमत आहे असं वाटत असतानाच, अक्षर पटेलने बेअस्ट्रोचा अडथळा दूर केला.
बेन स्टोक्सच्या सर्वाधिक धावा (Ben Stokes 70 runs)
भारताच्या फिरकी तिकडीसमोर इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले असताना, इंग्लंडच्या आजी-माजी कर्णधारांनी काहीसा डाव सावरला. जो रुटने 60 चेंडूत 29 धावा केल्या. तर कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा काढल्या. जाडेजाने रुटला माघारी धाडत, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. मग ठराविक अंतराने जाडेजा, अश्विन, अक्षर पटेल आणि बुमराह विकेट घेत राहिले. पण एका बाजूने बेन स्टोक्स लढत राहिला. अखेर 64.3 षटकात बुमराहने बेन स्टोक्सची दांडी उडवून इंग्लंडची शेवटची विकेट मिळवली. स्टोक्सची रुपाने इंग्लंडला दहावा धक्का बसला!
India’s Playing XI in 1st Test – पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताची प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, केएस भरत (विकेटकिपर), रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, आर.अश्विन, जसप्रीत बुमराह(उप कर्णधार), मोहम्मद सिराजRohit Sharma, Yashasvi Jaiswal, Shubman Gill, Shreyas Iyer, KL Rahul, KS Bharat, Ravindra Jadeja, Axar Patel/Kuldeep Yadav, Ravichandran Ashwin, Jasprit Bumrah, Mohammed Siraj
England Playing XI for 1st Test पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग 11 –
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, जॅक क्रॉली, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, जो रूट आणि मार्क वूड. Zak Crawley, Ben Duckett, Ollie Pope, Joe Root, Jonny Bairstow, Ben Stokes (C), Ben Foakes, Rehan Ahmed, Tom Hartley, Mark Wood, Jack Leach
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक –
पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
संबंधित बातम्या
[ad_2]