Ajinkya Rahane Created History in WTC Final 2023 Against Australia; अजिंक्य रहाणेने WTC Final मध्ये रचला इतिहास

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन : आतापर्यंत एकाही खेळाडूला जी गोष्ट जमली नाही ती अजिंक्य रहाणेने या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत करून दाखवली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेने आता एक इतिहास रचला आहे.भारतीय संघ फॉलोऑनच्या छायेत असताना अजिंक्य फलंदाजीला आला. भारतीय संघ २०० धावांच्या आतमध्ये गारद होणार, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण त्यावेळी अजिंक्य भारतीय संघासाठी धावून आला. अजिंक्यने यावेळी फक्त आपलीच धावसंख्या वाढवण्यावर भर दिला नाही तर तो तळाच्या फलंदाजांना घेऊन खेळला आणि त्यामुळेच भारतीय संघ फॉलोऑनपासून वाचला. पण यावेळी अजिंक्यने एका इतिहासाची नोंद केली आहे.

अजिंक्य हा आता या विश्व अजिंक्य स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत भारताच्या एकाही खेळाडूला यापूर्वी या फायनलमध्ये अर्धशतक झळकावता आले नव्हते. पण अजिंक्यने या पहिल्या डावातच शतक झळकावले आहे. गेल्या फायनलमध्ये अजिंक्य भारताकडून खेळला होता खरा, पण त्याला जास्त धावा करता आल्या नव्हत्या. पण या फायनलमध्ये त्याने संघात स्थान पटकावले आणि इतिहास रचला आहे. त्यामुळे आता विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान आता अजिंक्यने पटकावला आहे. अजिंक्य सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजीला आला. त्यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर अजिंक्यने कसोटी क्रिकेटमधील आपल्या पाच हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. तिसऱ्या दिवशी जेव्हा लंचची घोषणा करण्यात आली तेव्हा ८९ धावांवर खेळत होता आणि त्यामध्ये ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्यामुळे अजिंक्य आपले शतक पूर्ण करेल, अशी आशा सर्वांना होती. त्यामुळे अजिंक्यच्या शतकाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या. पण भारताकडून जे कोणत्याही खेळाडूला जमले नाही ते अजिंक्यने या सामन्यात करून दाखवले आहे. त्यामुळे यानंतर जेव्हा जेव्हा या फायनलचा विषय निघेल तेव्हा अजिंक्यचे नाव मात्र नक्कीच घेतले जाईल.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

अजिंक्य रहाणे हा भारताच्या कसोटी संघात नव्हता. पण आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत त्याने भारतीय संघात स्थान पटकावले होते.

[ad_2]

Related posts