Shoaib Malik On Third Marriage Shoaib Malik broke silence on divorce with Sania Mirza marriage with Sana Javed Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shoaib Malik On Third Marriage : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) याने 18 जानेवारी रोजी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी तिसरा विवाह केला. लग्न उरकल्यानंतर दोघांनीही सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत सर्वांना धक्का दिला होता. अगोदरच दोन विवाह झाले असताना शोएबने सना जावेदशी (Sana Javed) तिसरा विवाह केल्याने सारेच हैराण झाले होते. दरम्यान, सना जावेदने विवाहाची घोषणा करताना शोएबने टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हिला घटस्फोट दिल्याचे स्पष्ट केले होते. तिसरा विवाह केल्यानंतर शोएब मलिकला नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात येत आहे. भारतीयच नाही तर पाकिस्तानी लोक देखील त्याला ट्रोल करत आहेत. दरम्यान, आता या सर्वांवर शोएबने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाला शोएब मलिक? 

शॅडो प्रॉडक्शनशी बातचित करताना शोएब (Shoaib Malik) म्हणाला, “तुमचं मन जे सांगेल, त्याप्रमाणे निर्णय घेतले पाहिजेत. लोक काय म्हणतील? याचा विचार करायचा नाही. तुम्ही तुमचे निर्णय घेत राहा. लोकांची मते समजून घ्यायला 10 ते 20 वर्ष लागतील. त्यानंतर लोकांच्या मतावर विचार करा.”

‘खुला’ घेत शोएब पासून वेगळी झाली सानिया 

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) याने 2010 मध्ये भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्याशी विवाह केला होता. हा शोएबचा दुसरा विवाह होता. त्यानंतर दोघांना एक मुलगा देखील झाला होता. इजहान असे या मुलाचे नाव आहे. घटस्फोट घेतल्यानंतर दोघेही मुलाचा सांभाळ करण्याची जबाबदारी दोघांनीही घेतली आहे. सानिया मिर्झाच्या वडिलांनी घटस्फोटाबाबत भाष्य केले होते.  दोघेही संमतीने वेगळे झाले आहेत. हा “खुला” आहे. सानियाने (Sania Mirza) खुला घेतला असल्याचे तिच्या वडिलांनी स्पष्ट केले होते. 

 ‘खुला’ म्हणजे नेमकं काय?

कुराणच्या नियमांनुसार, घटस्फोट आणि खुला यामध्ये मोठा फरक नाही. एखादी महिला जेव्हा पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेते. तेव्हा त्याला ‘खुला’ असे म्हटले जाते. तर वेगळे होण्याचा निर्णय पुरुषाने घेतला तर त्याला ‘तलाक’ म्हटले जाते. ‘तलाक’ घेतल्यानंतर महिला सलग 3 महिने आपल्या पतीच्या घरी राहते. कुराणमध्ये याबाबत स्पष्टपणे उल्लेख करण्यात आले आहेत. हीच भूमिका सानियाच्या वडिलांनी मांडली आहे. 

तिसऱ्या विवाहामुळे शोएबच्या घरची मंडळी नाराज 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोएबच्या (Shoaib Malik) तिसऱ्या विवाहामुळे त्याच्या घरचे लोकही नाराज झाले आहेत. त्याच्या विवाहप्रसंगी घरातील कोणताही व्यक्ती हजर नव्हता. मात्र, शोएबच्या (Shoaib Malik) लहान भावाने त्याला तिसऱ्या विवाहासाठी शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्याचे अभिनंदन देखील केले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 

Ayushmann Khurrana : आयुष्यमान खुराना, अमेरिकन गायक एरिक नाम आणि ‘खाने पें चर्चा’! भन्नाट फूड टूरमध्ये दोघांनी कशावर ताव मारला?

 

 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts