Merit and majority common comment by from Ajit Pawar and Chief Minister Eknath Shinde over party name and symbol( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ajit Pawar and Eknath Shinde : शिवसेनेच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणातही निवडणूक आयोगाने नाव बदलून जवळपास एकच निर्णय दिल्याने शरद पवार यांनी हातातील पक्ष गमावला आहे. शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवार यांच्या हातात गेलं आहे. निवडणूक आयोगाने बहुमताच्या जोरावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाकडे दुर्लक्ष करत अजित पवार यांच्याकडे पक्ष दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडेच राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्ष असेल, यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब करून दिलं आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व

त्यामुळे शरद पवार यांना राजकीय कारकीर्दीच्या उत्तरार्धामध्ये मोठा राजकीय झटका बसला आहे. अर्थात शरद पवार हार  मांडणाऱ्यांपैकी नसले तरी लोकसभेसाठी राहिलेला कालावधी पाहता पक्षाचे नवीन चिन्ह आणि नाव लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सर्वात मोठं आव्हान असणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर साहजिकच राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी अजित पवार गटाला चिन्ह आणि पक्ष मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला. याच प्रक्रियेतून गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा निर्णयावर आनंद व्यक्त केला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकशाही प्रमाणे मेरिटवर त्यांना ते पक्ष आणि चिन्ह मिळाले. त्यांना मी शुभेच्छा देतो. आम्हाला देखील निवडणूक आयोगाने मेरिटवर पक्ष, चिन्ह दिलं होतं. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. आगामी लोकसभेमध्ये महायुतीला 45 प्लस जागा मिळतील, सहानुभूती नाही, तर लोकं कामाला महत्त्व देत असल्याचं ते म्हणाले.  लोकांना विकास हवा आहे, जनता विकासाची मागे असते असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

अजित पवारही म्हणाले, मेरीट आणि बहुमत

चिन्ह आणि पक्ष मिळाला अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर कोणतंही थेट भाष्य न करता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर जे बोलत होते किंवा बोलत आले आहेत तेच सावधपणे बोलण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांच्या तोंडूनही मेरीट आणि बहुमत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने शिवसेने संदर्भात निकाल देताना संसदीय पक्ष आणि मूळ पक्ष स्वतंत्र असल्याची स्पष्टपणे सांगितले होते. मात्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा या प्रकरणामध्ये निकाल समोर असतानाही बहुमताने आणि मेरिटने निकाल लावून दिला आहे. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले त्यावेळी अजित पवार यांनी खोचक शब्दांमध्ये सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली होती.

मात्र आता तेच अजित पवार राष्ट्रवादीला फोडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर जे एकनाथ शिंदे यांनी मेरिट आणि बहुमत शब्दांचा सातत्याने वापर केला तोच शब्द राष्ट्रवादीच्या निकालाचे समर्थन करताना दिसून आले. त्याचबरोबर त्यांनी बोलताना हा निर्णय निवडणूक आयोगाच्या आव्हान देता येत नाही, असे म्हणत निर्णय कसा बरोबर आहे हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

Related posts