( प्रगत भारत । pragatbharat.com)
Rajyog 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक ठराविक महत्त्व आहे. यामध्ये वाशी राजयोगाला देखील भरपूर महत्त्व देण्यात आलं आहे. येत्या महिनाभरात वाशी राजयोग तयार होणार आहे. यामुळे काही राशींना त्याचा फायदा होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांवर या राजयोगाचा प्रभाव राहणार आहे.
जेव्हा सूर्य सिंह राशीत असेल तेव्हा चंद्र कर्क राशीत असणार आहे. यावेळी शुक्र ग्रह सूर्यापासून १२व्या भावात असणार आहे. त्यामुळे वाशी राजयोग तयार होत आहे. हा राजयोग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. यासोबतच सिंह राशीत सूर्याच्या संक्रमणादरम्यान चंद्र आणि मंगळाचा शुभ संयोगही होणार आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांसाठी येणारा महिना खूप शुभ ठरणार आहे.
सिंह रास
या राशीच्या लोकांसाठी वाशी राजयोगाची निर्मिती खूप फायदेशीर ठरणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास पाहायला मिळणार आहे. या राशीच्या लोकांना स्वतःमध्ये एक विशिष्ट सुधारणा दिसून येऊ शकते. या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढणार आहे.
तूळ रास
या राशीच्या लोकांसाठी वाशी राजयोग विशेष असणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे तूळ राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. अनेक दिवसांपासून असलेल्या इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे कमवू शकता. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान वाढणार आहे. यावेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो.
वृश्चिक रास
वाशी राजयोगाच्या प्रभावामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात लवकरच सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात यश मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली होणार आहे. या काळात तुमची बचतही वाढू शकते.तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. संपत्ती वाढवण्याच्या चांगल्या आणि नवीन संधी मिळतील. तुम्ही मालमत्ता वाहन खरेदी करू शकता.
धनु रास
या राशीच्या लोकांसाठी वाशी राजयोग खूप फलदायी असणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे धनु राशीच्या लोकांना खूप चांगले लाभ मिळतील. तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी खूप फलदायी असणार आहे. या काळात तुम्ही तुमचे पालक किंवा त्यांच्या नातेवाईकांमार्फत लाभ मिळवू शकता. तुमच्यापैकी जे लोक या काळात तुमची नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांचा व्यवसाय मालमत्ता, रिअल इस्टेट आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)