Opposite Party On Election Commission Where Sanjay Raut criticize Maharashtra Politics ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com)

Opposite Party On Election Commission : निवडणूक आयोग सुपारीबाज संस्था : संजय राऊत
एकीकडे अजित पवार गटानं राज्यात अनेक ठिकाणी सेलिब्रेशन केलं… तर पुण्यात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत.. पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर लावण्यात आलेला अजित पवारांच्या नावाचा बोर्ड शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकलाय. पक्षात फूट पडल्यानंतर लगेच अजित पवार गटाकडून पुण्यातील पक्षकार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला होता . मात्र प्रशांत जगताप यांनी तो हाणून पडला होता 
तर दुसरीकडे शरद पवार गटातील नेत्यांनीही आश्वासक वक्तव्य करायला सुरुवात केली.. आपल्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न सुरु केला… पुढच्या काळात देशात आणि राज्यात महत्वाच्या निवडणुका आहेत.. त्यामुळे मविआच्या नेत्यांनीही कालच्या निकालानंतर एकजूट दाखवायला सुरुवात केली.. पाहुयात मविआतील तीन प्रमुख नेत्यांची वक्तव्य… 

Related posts