[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
MNS News : मनसे नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची गुरूवारी तर सोमवारी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याचं समोर येतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची येत्या 8-10 दिवसात पुन्हा बैठक होऊ शकते. ज्यात काही फॉर्म्युला वर चर्चा होऊ शकते. त्यामुळे मनसे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय भूकंप होण्याची शक्यता.
राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अशात मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या हालचालींना देखील वेग येतांना पाहायल मिळत आहे. मनसेचे नेत संदिप देशपांडे, बाळा नांदगांवकर, नितिन सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती समोर येत असतानाच, आता मनसे नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. सोबतच लवकरच तीनही पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
[ad_2]