Pune Political News NCP sharad pawar Group jayant patil planning for Pune Election prashant jagtap Candidate for election pune political news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India)  राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात  (ajit Pawar) आलं. त्यानंतर शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे पक्षाचं नाव मिळालं.  यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. येत्या काळात पक्षाची कामगिरी कशी असेल किंवा पुण्यातील चित्र कसं असेल?, पक्षातील कार्यकर्ते कशापद्धतीने काम करतील आणि अर्थात शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल, यासंदर्भातील सगळा प्लॅन सांगितला आहे. हडपसर मतदारसंघात मेळावा होत आहे. या मेळाव्यात त्यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचा आगामी प्लॅन सांगितला आहे. 

जयंत पाटील हे कार्यकर्त्यांना सूचना देताना म्हणाले की, गेल्या काही दिवसात जे काही घडलंय हे आपणा सर्वांना माहित  आहे. त्यामुळे आता नव्याने लढायला सुरूवात करत आहोत. सगळ्यांना बुथ कमिट्यावर काम करायचं आहे. पक्षाचं काहीही झालं असलं तरीही अनेक लोक आपल्यासोबत आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने काम केलं चांगलाच निकाल मिळेल.

 हडपसरचा उमेदवार जाहीर करुन टाकला?

सध्या आगामी निवडणुकीसाठी अनेकजण तयारी करत आहे. त्यात शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे उमेदवार जाहीर केला आहे. ते म्हणाले की प्रशांत जगताप हडपसरमधून आरामात निवडून येऊ शकतात. प्रशांत जगताप यांच्या नामाची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे.  गेल्या निवडणुकीत अवघ्या चेतन तुपे 2700 मतांनी निवडून आले तरीही ते अजित पवारांसोबत गेलेत. आता त्यांना भाजप कसं हे ते कळेल, अशीटी टीका त्यांनी तुपे यांच्यावर केली आहे. 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts