On February 11 Shani will be God There is a possibility of loss for persons of this zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shani Ast: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाचं गोचर होतं. यामध्ये शनी सर्वात धिम्या गतीने फिरणारा ग्रह आहे. शनीची गती सर्वात कमी मानली जाते. शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत आहे. या वर्षी शनी आपली राशी बदलणार नाही पण ते त्यांच्या स्थिती बदलत करणार आहेत. 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.56 वाजता शनिदेव कुंभ राशीत अस्त होणार आहेत.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, एकीकडे शनीच्या अस्तामुळे काही राशींना विशेष लाभ होऊ शकतो. मात्र काही राशींना शनीदेवाचं अस्त होणं हानी पोहोचवू शकते. ज्यावेळी शनी अस्त होईल त्यावेळी काही राशींच्या समस्या वाढू शकतात आणि त्यांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जाणून घेऊया शनीच्या अस्तामुळे कोणत्या राशींना काळजी घ्यावी लागेल.

मेष रास (Aries)

मेष राशीच्या अकराव्या घरात शनि अस्त होणार आहे. या काळात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या काळात गुंतवणूक टाळा. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही अडचणींचा सामना करावा लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठे नुकसान होऊ शकते. या काळात तुमची आर्थिक स्थितीही कमकुवत राहील. 

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या नवव्या आणि दहाव्या घराचा स्वामी शनी आहे. फेब्रुवारीमध्ये शनी अस्तामुळे या व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरदार लोकांना नोकरीत वरिष्ठांसोबत वादाला सामोरे जावे लागू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे, त्यांची फसवणूक होऊ शकते. कोणत्याही शुभ कार्यक्रमाचे आयोजन करू नका. 

कन्या रास (Vigro)

या राशीच्या पाचव्या आणि सहाव्या घराचा स्वामी शनी आहे. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. या काळात आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. एखादा जुना आजार तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतो. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामात विविध प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जीवनात संतुलन राखावे लागेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts