U19 World Cup Final 2024 Uday Saharan Team Remind Rohit Sharma Indian Team Of World Cup 2023( प्रगत भारत । pragatbharat.com)

U19 World Cup 2024 Final, Indian Team : अंडर19 विश्वचषकाचा अंतिम सामना (World Cup 2024 Final) रविवारी होणार आहे. भारतानंतर ऑस्ट्रेलियानेही फायनलमध्ये धडक मारली. आता या दोन संघामध्ये (IND vs AUS Final) चषकासाठी लढत होईल. अंडर 19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये (IND vs AUS Final) पोहचणाऱ्या युवा ब्रिगेडचा प्रवास रोहित शर्माच्या (Rohit Sharma) संघासारखाच आहे. अंडर 19 विश्वचषकाच्या फायनलपर्यंत भारतीय संघाने अजय प्रवास केला आहे. उदयच्या युवा संघाचा प्रवास पाहिल्यास रोहित शर्माच्या संघाचा 2023 विश्वचषकातील प्रवास डोळ्यासमोरुन जातो. रोहित शर्माच्या संघाचा 2023 वनडे विश्वचषकात फायनलप्रर्यंतचा प्रवास अजेय होता. रोहितसेनेला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता उदयची युवा ब्रिगेडही एकही सामना न गमावता फायनलपर्यंत पोहचली आहे. रविवारी खिताबी सामना रंगणार आहे. 

पराभवाचा वचपा काढण्याची संधी – 

सहा महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दुसऱ्यांदा फायनलमध्ये दाखल झाले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा पराभव करत पॅट कमिन्सच्या संघाने जेतेपद मिळवले होते. आता याच पराभवाचा बदला घेण्याची संधी युवा भारतीय संघाकडे असेल. 11 फेब्रुवारी रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये विलोमूर पार्कमध्ये अंतिम लढत होणार आहे. 

रोहित आणि उदयचा संघ सेमीफायनलपर्यंत अजय –

अंडर-19 वर्ल्ड कपमधील भारतीय युवा संघ आणि वनडे वर्ल्डकप 2023 मधील सिनियर भारतीय संघाने सेमीफायनलपर्यंत सारखाच प्रवास केला आहे. रोहित शर्माचा संघाचाही विश्वचषकात दबदबा पाहायला मिळाला होता. पण फायनलमध्ये पराभव पत्कारावा लागला होता. उदयचा संघानेही फायनलमध्ये धडक मारली आहे. उदयच्या युवा ब्रिगेड आतापर्यंत अजय राहिलाय. आता रविवारी ऑस्ट्रेलियाविरोधात फायनल होणार आहे. भारतीय संघ विजयापासून एक पाऊल दूर आहे. पण अडथळा कांगारुंचा आहे. रोहित शर्माच्या संघाला हा अडथळा पार करता आला नव्हता. ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला अन् कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा झाला होता. आता उदयच्या नेतृत्वातील भारतीय संघ हा अडथळा पार करणार का? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहे. 

या खेळाडूंच्या खांद्यावर जबाबदारी – 
 
अंडर-19 विश्वचषकात आतापर्यंत भारतीय संघ अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. कर्णधार उदय सहारन, सचिन धस, मुशीर खान आणि सौमी पांडे या सर्वांनीच आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. भारताच्या या चार खेळाडूंवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना जिंकण्याची सर्वाधिक जबाबदारी असेल. विशेषत: उपांत्य फेरीत कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस यांनी दाखवलेला संयम लक्षात घेता खेळी केली होती.  

भारतीय संघ अजेय, विश्वचषकाचा प्रबळ दावेदार – 

उपांत्य सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा दोन विकेटनं पराभव करत दहाव्यांदा अडंर 19 विश्वचषकाची फायनल गाठली. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ अजय आहे. भारतीय संघाला विश्वचषकाचा प्रबळ दावेदार म्हटले जातेय. अंडर  19 विश्वचषकात युवा भारतीय सघाचा (IND U19 vs SA U19) दबदबा राहिला आहे. उदय सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने आतापर्यंत एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. सलग सहा सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला . युवा ब्रिगेडचा सामना आता ऑस्ट्रेलियाविरोधात होईल. भारतीय संघाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, आयर्लंड, अमेरिका, न्यूझीलंड आणि नेपाळ संघाचा पराभव केला. भारताच्या संघाने आतापर्यंत सर्वच क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे.  

उदय सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने बांगलादेशविरात विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात केली होती. पहिल्याच सामन्यात युवा ब्रिगेडने 84 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा 201 धावांनी सुपडा साप केला. तिसऱ्या सामन्यात भारताने अमेरिकेला 201 धावांनी नमवलं. न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव करत टीम इंडियाने विजयाचा चौकार लगावला.  पाचव्या सामन्यात नेपाळचा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय संघाने तीन सामने 200 पेक्षा जास्त धावांनी जिंकले आहेत. कर्णधार उदय सहारन  याला इतिहास रचण्याची संधी असेल.

आणखी वाचा :

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये 6 महिन्यात दुसऱ्यांदा फायनल, रोहितच्या पराभवाचा बदला घेण्याची युवा ब्रिगेडकडे संधी

Related posts