Abhishek Ghosalkar Firing in Dahisar maharashtra news update abp majha marathi news( प्रगत भारत । pragatbharat.com)

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरण नेमकं काय ? महाराष्ट्रात सध्या चाललंय तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला पडावा इतक्या भयंकर घटना सध्या या राज्यात घडतायत. कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची आधी पुण्यात त्याच्याच साथीदारांनी दिवसाढवळ्या, भर रस्त्यात हत्या केली. मग कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्थानकातच शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच, मुंबईतल्या दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडून त्यांची आज हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या स्वयंघोषित नेत्यानं हा गोळीबार केला. आणि धक्कादायक बाब म्हणजे नोरोन्हानं त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. मंडळी, सोबतचा व्हिडीओ पाहिला नसता तर तुमचा आमचा विश्वासही बसला नसता, पण अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा हे दोघं तब्बल ४० मिनिटं एकत्र फेसबुकवर लाईव्ह गप्पा मारत बसले होते. फेसबुक लाईव्ह जेव्हा संपत आलं, तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, त्यानं पिस्तुल काढलं आणि पुन्हा खोलीत शिरून त्यानं अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार केला. अचानक झालेल्या हल्ल्यातून सावरण्याच्या आत ते जमिनीवर कोसळले. अभिषेक घोसाळकरांना तातडीनं करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तातडीनं शस्त्रक्रियाही सुरू झाली. पण अतिरक्तस्त्रावानं त्यांचा मृत्यू झाला. 

Related posts