महाराष्ट्राचा UP, बिहार होतोय का?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर यांचा गुरुवारी झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. अभिषेक घोसाळकर यांची ही हत्या महाराष्ट्रातील या महिन्यातील पहिला घटना नाही आहे. तर गेल्या एक महिन्यात महाराष्ट्र अशा चार घटनांनी हादरला आहे. 

त्यामुळे महाराष्ट्राचा UP, बिहार होतोय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  

एका महिन्यात 4 घटना

१) पहिली घटना 

5 जानेवारी 

पुण्यातला कुख्यात गुंड शरद मोहोळवर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गोळीबार करण्यात आला.

२) दुसरी घटना

2 फेब्रुवारी  

कल्याणजवळील उल्हासनगरमध्ये घडली आहे. सत्ताधारी भाजपचा आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला

३) तिसरी घटना

7 फेब्रुवारीला

जळगावच्या चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार झाला. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडीमधली ही घटना आहे. माजी भाजप नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे आपल्या कार्यालयात बसलेले असताना, तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 4 ते 5 तरुणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मोरे यांची प्रकृती चिंताजनक असून, गोळीबाराचं CCTV फुटेज समोर आले आहे.

४) चौथी घटना

8 फेब्रुवारी

दहिसरमध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची अगदी जवळून गोळी झाडून हत्या करण्यात आली. ते  माजी आमदार विनोद घोसाळकरांचे चिरंजीव आहेत. अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या घालणाऱ्या मॉरिसची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 


हेही वाचा

ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकरांना गोळ्या घालणारा मौरिस भाई कोण होता?

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा – संजय राऊत

[ad_2]

Related posts