Dismiss Maharashtra government and impose President rule Sanjay Raut On Abhishek Ghosalkar Firing Case Criticism of CM Eknath Shinde Devendra Fadnavis marathi news( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut On Abhishek Ghosalkar Firing Case : महाराष्ट्रात माफिया राज पाहायला मिळत आहे. हे अपयश घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याचं आहे. राज्यात हत्या, दरोडा सारख्या घटना घडत आहे. राज्याचं सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा अशी मागणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar)  यांच्या हत्येच्या घटनेवरून संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दीड वर्षात फक्त गुंडगिरीच्या बातम्या कानावर येत आहे. आमदार गुंडगिरी करून जमिनी ताब्यात घेत आहे. न्यायालयाच्या परिसरातून अपहरण होत आहे. या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत,ते अदृश्य आहे. चाय पे चर्चा करणारे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर कधी चर्चा करणार. गुंडांसोबत चाय पे चर्चा होत आहे. शिंदे गटाचे लोक गुंडांसोबत रोज चाय पे चर्चा करत आहे. देवेंद्र फडणवीस अत्यंत अपयशी गृहमंत्री आहेत. आमच्यावर टीका करण्यासाठीच फक्त फडणवीस यांना गृहमंत्री पद दिला आहे. महाराष्ट्राची जनता तुमचं राजीनामा मागत आहे. राज्यातील गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा.

अनेक कंत्राट गुंडांना दिले जातायत….

पुढे बोलतांना संजय राऊत म्हणाले की, “गुंडांनी गुंडांसाठी चालविले राज्य म्हणजे म्हाराष्ट्र राज्य अशी परिस्थिती काही दिवसांपासून झाली आहे. मंत्रालय, नागपूरच्या विधान भवनात अनेक गुंड हे मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या चिरंजीवांना भेटत आहे.  मुख्यमंत्र्यांचे स्वागताचे बॅनर कोण लावत आहे. अनेक कंत्राट हे गुंडांना दिले जात आहे. असेच एक रुग्णवाहिकेचे 8 हजार कोटींचे काम देण्यात आले. अनेक माफिया या टेंडरमध्ये लाभार्थी आहेत. सरकारचे पैसे हे गुंडांसाठी वापरले जात आहे. कल्याणला गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला, त्यात शिंदे आणि त्यांच्या चिरंजीवाच नाव आले आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी केली पाहिजे होती. गणपत गायकवाड यांनी थेट सांगितले आहे की, माझे कोटीच्या कोटी रुपये शिंदेकडे पडून राहिले आहे. तरी देखील कारवाई होत नसल्याचा आरोप राऊत यांनी केला. 

लोकप्रतिनिधीची दिवसाढवळ्या हत्या अन् तुम्ही वाढदिवस साजरा करतात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्राचा सूढ घेण्याचं ठरवलं आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीत जाणार आहे. पण त्यांच्याकडून आतापर्यंत कारवाई करू असे म्हटले गेले नाही. मुंबईत एका लोकप्रतिनिधीची दिवसाढवळ्या हत्या होते आणि तुम्ही वाढदिवस कसले साजरे करतात असे म्हणत राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला. त्यामुळे, मी त्यांना एवढ्याच शुभेच्छा देईल की, दीड वर्ष भोगले आता दूर व्हा, खोके जमले आणि खोके वाटले. आमच्या लोकांना दूर केले गेले. महाराष्ट्राची वाट लावली असल्याचे म्हणत राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. 

अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर

विरोधक गोळीबाराच्या घटनेचा फायदा घेत असल्याच्या आरोप करणाऱ्या अजित पवारांना देखील राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. “ही गोष्ट फायदा घेणायची आहे का? आमचा एक तरुण सहकाऱ्याची हत्या झाली आहे. तुमच्यावर आरोप आहे की, तुम्ही आर्थिक माफिया आहेत. तुमच्या चिरंजीवाचे फोटो येत आहेत, असे म्हणत राऊतांनी पवारांवर निशाणा साधला. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

आधी दोस्ती केली, त्यानंतर प्लॅन करून संपवलं; अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचं कारण आले समोर

अधिक पाहा..

Related posts