Who Is Abhishek Ghosalkar former corporater and shiv sena ubt morris Noronha bhai dahisar firing case mumbai crime news abpp

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Who Is Abhishek Ghosalkar:  शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक (Shiv Sena UBT) अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar)  यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या (Abhishek Ghosalkar Firing Case) करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या (Morris Noronha) स्वयंघोषित नेत्याने हा गोळीबार केला, आणि त्यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. बोरीवली मतदार संघात घोसाळकर कुटुंबाचा मोठा राजकीय दबदबा आहे.  पहिल्यापासून हे कुटुंब ठाकरेंसोबत आहेत. 

कोण आहेत अभिषेक घोसाळकर? Who Is Abhishek Ghosalkar

घोसाळकर कुटुंबीय कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर घोसाळकर कुटुंबांने उद्धव ठाकरे यांना साथ दिली. अभिषेक घोसाळकर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत. दहिसर कांदारपाडा वॉर्ड नं 7 चे माजी नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिलेय. मुंबई महापालिकेत दोनदा नगरसेवक पद भूषवलं आहे. माजी आमदार विनोद घोसाळकरांचे अभिषेक हे सुपुत्र आहेत. विनोद घोसाळकर यांनी 2009 ते 2014 या कालावधीत मुंबईतील दहिसर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले.

 दहिसरमधील तरुण नेतृत्व म्हणून अभिषेक घोसाळकर यांची ओळख होती. घोसाळकर मुंबै बँकेचे संचालकदेखील आहेत. तर अभिषेक गोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी वार्ड क्रमांक एकच्या नगरसेविका होत्या. बोरीवली मतदार संघात घोसाळकर कुटुंबाचा मोठा  राजकीय दबदबा आहे. अभ्यासू आणि तळमळीने काम करणारा नेता म्हणून अभिषेक घोसाळकर यांची प्रतिमा होती.  

मॉरिस नोरोन्हाला तुरुंगात टाकण्यात पुढाकार – 

अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडून हत्या करणारा मॉरिस नोरोन्हा (Morris Noronha) विरोधात मुंबईच्या एमएचबी  पोलीस ठाण्यात कलम 376  नुसार बलात्कार आणि 509 विनयभंग करण्याच्या उद्देशाने महिलेला अश्लील शेरेबाजी केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. बलात्काराप्रकरणी मॉरिसला अटक देखील झाली होती आणि काही महिने तो पुण्याच्या येरवडा कारागृहात बंद होता. दोन्ही गुन्ह्यात अभिषेक घेसाळकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याची मॉरिसची धारणा होती आणि त्यातूनच त्यांच्यातील वैर वाढल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळेच प्लॅन करून अभिषेक घोसाळकरांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. 

मॉरिस नोरोन्हा स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता समजायचा, परिसरातील लोक त्याला मॉरिस भाई या नावाने ओळखत होते. बोरिवलीतील आयसी कॉलनी परिसरात समाजसेवक कार्यकर्ता म्हणून मॉरिसची ओळख होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि मॉरिसमध्ये वाद सुरू होता. हा वाद संपवण्यासाठी दोघांनी फेसबुक लाईव्ह केले. अनेक नेत्यांसोबतचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मॉरिस नोरोन्हा स्वत:ला वर्णन पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ता म्हणतो.  कोविडच्या काळात त्याला काही पुरस्कारही मिळाले आहेत. 

मॉरिस याच्या सोशल मीडियावर अनेक मोठ्या राजकारण्यांसोबतचे फोटो पाहायला मिळतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही त्याचा फोटो आहे. अभिषेक आणि मॉरिसचे ऑफिस एकमेकांच्या शेजारी होते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक राजकारणातील वर्चस्वाच्या लढाईवरून दोघांमध्ये बराच काळ राजकीय वैर सुरू होते.

गोळीबार प्रकरण नेमकं काय?

मॉरिस दहिसर-बोरिवली परिसरात एनजीओ चालवायचा. परिसरात मॉरिसची स्वयंघोषित नेता म्हणून ओळख होती. वर्षभरापूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता.अभिषेक घोसाळकरांनी नोरोन्हा विरोधात पोलिसांत तक्रार केली होती. तेव्हा दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी घट्ट मैत्री देखील झाली होती. त्यानंतर  दोघं सोबत फेसबुक लाईव्ह करत होते. फेसबुक लाईव्ह संपत आलं असताना मॉरिसनं गोळ्या झाडल्या.  

घोसाळकर यांच्या हत्येमागे वैयक्तिक राजकीय वैमनस्य असल्याचे सांगण्यात येत आहे.गेल्या वर्षी एका फौजदारी खटल्यात मॉरिसला तुरुंगात पाठवण्यात घोसाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मॉरिस आणि घोसाळकर यांच्यात तीव्र द्वेष होता. मात्र, त्यांच्यातील वाढत्या भांडणानंतरही मॉरिसने मैत्रीचा हात पुढे करण्याच्या बहाण्याने गुरुवारी अभिषेकला आपल्या कार्यालयात बोलावले होते. त्यानंतर दोघांनी फेसबुक लाईव्ह केले. घोसाळकर जायला निघायले होते, त्यावेळी मॉरिसभाईने गोळ्या झाडल्या. 

आणखी वाचा :

 Morris Noronha: बलात्काराच्या आरोपात जेल, थंड डोक्यानं गोळीबार, कोण आहे मॉरिस भाई?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts