Pune Crime News maharshtra DCM Ajit Pawar On Mulshi murder case sharad mohol muder pune crime

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : सध्या गोळीबाराचे प्रकरणं वाढत आहे. मात्र गुंडाने गुंडाचा काटा काढला हे (Pune Crime News) खरं आहे की नाही?, अशी रोखठोक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol Case) हत्या करण्यात आली होती. त्यानंतर राज्याला हादरवणारे गोळीबाराचे प्रकरणं समोर आले आहे. जमिनीच्या वादातून, पूर्ववैमनस्यातून आणि तिसरा गोळीबाराचं कारण समोर येईल. तिन्ही घटना बघितल्या तर  वेगवेगळ्या कारणावरुन झालेला गोळीबार आहे. राज्यात असे गुन्हे घडायला नकोत, असंही अजित पवार म्हणाले. 

मुळशी हत्याकांड टोळीयुद्धातून

पुण्याला हादरवून टाकणारी शरद मोहोळची हत्या गुंडांच्या टोळीवादातूनच आणि वर्चर्स्वातून करण्यात आली होती. मारेकरी साहिल मुन्ना पोळेकर याने सुतारदऱ्यात भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या केली होती. यावरुन पुण्यातील टोळीयुद्ध पुन्हा एकदा पाहायला मिळालं. या प्रकरणी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणेसह 16 जणांना अटक करण्यात आली आहे. 

साथीदार होते पण त्यांनीच काटा काढला…

शरद मोहोळचे हे मारेकरी त्याचे साथीदार म्हणून त्याच्या टोळीत काम करत होते. यातील साहील पोळेकर हा तर हत्येच्या आधी काहीवेळ शरद मोहोळच्या घरी त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात देखील सहभागी होता. वरवर शरद मोहोळचे साथीदार असल्याचे दाखवणारे हे मारेकरी शरद मोहोळवर नाराज होते. विठ्ठल गांडले याच्यासोबत शरद मोहोळची मुळशी तालुक्यात जुनी भांडणे होती तर साहील पोळेकर याच्यासोबत देखील जमीन आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाले होते. त्यातून त्यांनी शरद मोहोळच्या हत्येची योजना आखली आणि अतिशय थंड डोक्याने ती अंमलात आणली. या प्रकरणी पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे. 

वर्चस्वाच्या लढाईनं जीव घेतला

पुण्यातून लवासा  सिटीकडे जाताना वाटेत लागणारं  मुठा नावाचं  गाव हे शरद मोहोळच तर तिथून पुढे पंचवीस किलोमीटर अंतरावरील वेगरे नावाचं गाव शरद मोहोळची हत्या घडवून आणणाऱ्या नामदेव कानगुडेच  तर मुठा गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेलं उरवडे गाव आहे.  या हत्येतील दुसरा मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलारचे आहे. मुळशी खोऱ्यातील या लहान – लहान गावांमध्ये वर्चस्व कोणाचं राहणार यातून निर्माण वादातून शरद मोहोळची हत्या झाल्याचं समोर आले आहे.  

मामाचा अपमान; भाच्यानं काढला काटा 

2010 मध्ये नामदेव कानगुडेकडून स्थानिक वादातून शरद मोहोळच्या मावस भावाला मारहाण करण्यात आली. शरद मोहोळने त्याचा बदला घेण्यासाठी नामदेव कानगुडेला मारहाण केली. पुढे दोघांमध्ये समझोता झाला आणि दोघे एकत्र काम करायला लागले. मात्र मागीलवर्षी वेगरे गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत नामदेव कानगुडेची भावजय निवडणुकीला उभी राहिली. कनगुडेने शरद मोहोळकडे त्यासाठी मदत मागितली. मात्र ती न मिळाल्यानं दोघांमध्ये वाद झाला. त्यातून अपमानित झालेला नामदेव कानगुडेला रडताना त्याचा भाचा असलेल्या साहिल पोळेकरने पाहिलं आणि दोघांनी मिळून शरद मोहोळचा काटा काढायचं ठरवलं.

इतर महत्वाची बातमी-

Ajit Pawar On Pune Crime : परेड काढूनही कोणाची मस्ती असेल तर पोलीसी खाक्या दाखवायला लागेल; अजित पवारांकडून गुन्हेगारांना तंबी

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts