India vs Australia U19 Cricket World Cup Final 2024 Date Time Live Streaming Telecast Squads All Details Sachin Dhas beed

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs Australia U19 World Cup Final : अंडर-19 क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. त्यामुळे वरिष्ठ टीमच्या झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी 11 फेब्रुवारीला दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघाने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. आता दोन्ही संघ जेतेपदासाठी भिडणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रविवारी 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. टीम इंडिया सहाव्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 5 वेळा अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे.

लाइव्ह स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्ट कधी, कुठे आणि कसे पाहू शकता?

भारतीय चाहत्यांना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येणार आहे. याशिवाय, तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुम्ही इतर अनेक भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेऊ शकाल. 

टीम इंडियाचा या स्पर्धेतील प्रवास कसा राहिला?

उदय सहारनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात केली. यानंतर टीम इंडियाने बांगलादेश, आयर्लंड, अमेरिका, न्यूझीलंड, नेपाळ आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारतीय संघाने या स्पर्धेतील सलग 6 सामने जिंकले. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 1 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 48.5 षटकांत 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 49.1 षटकांत 9 गडी राखून लक्ष्य गाठले. याआधी भारतीय संघाने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 2 गडी राखून पराभव केला होता.

बीडचा सचिन धस बाजी पलटवण्यास सज्ज (Who Is Sachin Dhas) 

दुसरीकडे अंडर-19 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आफ्रिकेचा 2 गडी राखून पराभव करून भारताने 9 व्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. भारताच्या विजयात बीड जिल्ह्यातील मराठमोळ्या सचिन धसने महत्त्वपूर्ण योगदान दिले. सचिनने कर्णधार उदय सहारनसोबत भागीदारी करत भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेसमोर 245 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने अवघ्या 32 धावांवर 4 विकेट गमावल्या. यानंतर सचिन धस आणि कर्णधार सहारन यांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 171 धावांची (187 चेंडू) भागीदारी केली आणि संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. 

सचिन धस कोण, तेंडुलकरशी काय संबंध?

सचिन धस हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आहे. सचिनचे वडील संजय धस यांनी आधीच ठरवले होते की ते आपल्या मुलाला क्रिकेटर करायचं. सचिनच्या वडिलांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांनी आपल्या मुलाचे नाव सचिन तेंडुलकरच्या नावावर ठेवले आहे. सचिन धसच्या वडिलांनी सांगितले की, सुनील गावसकर यांच्यानंतर सचिन तेंडुलकर त्यांचा आवडता क्रिकेटर होता, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव दिग्गज तेंडुलकरच्या नावावर ठेवले. सचिनचे वडील संजय म्हणाले की, त्यांनी सुद्धा विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळला आहे. सचिनच्या आईबद्दल सांगायचे तर त्या महाराष्ट्र पोलिसात सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) आहेत. सचिनची आईही कबड्डीपटू राहिली आहे.

उत्तुंग षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध

सचिनने पुण्यातील 19 वर्षांखालील निमंत्रित स्पर्धेत सहा षटकार मारून सर्वांना आश्चर्यचकित केले. सचिनला पाहून स्पर्धेचे आयोजक पूर्णपणे चकित झाले. शानदार षटकार पाहून त्याने सचिनच्या बॅटचीही तपासणी केली.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts