Maharashtra Manoj Jarange Maratha Reservation Marathi news Maratha brothers call their MLAs from tomorrow Manoj Jarange appeal( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarange On Maratha Reservation : सरकारने दोन दिवसात विशेष अधिवेशन बोलावून अधिसूचनेचे रूपांतर करावं असं आवाहन मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे अहमदनगरच्या (Ahmednagar) श्रीगोंदा येथे झालेल्या सभेत बोलताना जरांगे म्हणाले, सरकारने सग्या-सोयऱ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासंबंधी अध्यादेश काढला आहे. याबरोबरच शिंदे समितीचा अहवाल देखील सादर करण्यात आला आहे. तो स्वीकारावा याबरोबरच अध्यादेशाच कायद्यात रूपांतर करावं हे सर्व करण्यासाठी विधिमंडळाच अधिवेशन गरजेचं आहे, 15 तारखेला अधिवेशन होत आहे, या आधीच विशेष अधिवेशन घेऊन कायदा मंजूर करावा, अशी विनंती जरांगे यांनी केली आहे.

आपापल्या आमदारांना उद्यापासून फोन करा – मनोज जरांगे

मराठा बांधवानी आपापल्या आमदारांना उद्यापासून फोन करावे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. यामागे आमची भूमिका नसून सर्व आमदारांनी कायद्याच्या बाजूने बोलावं यासाठी आग्रह असणार आहे, मी देखील सर्व आमदारांना विनंती करतो मराठ्यांच्या मुलाबाळांसाठी आपण कायद्याच्या बाजूने उभा रहावं असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

 

10 फेब्रुवारीपासून कठोर आमरण उपोषण करणार

मराठा आरक्षणाबाबत  सरकराने काढलेल्या अध्यादेशानंतर मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, जरांगे यांची फसवणूक झाल्याची टीका सोशल मीडियामधून होत असल्याने आता जरांगे संतापले असून, त्यांनी टीका करणाऱ्यांना थेट इशारा दिला होता. माझ्याविरोधात काहींनी सुपारी घेतलीय, यापुढे ते शांत न बसल्यास त्यांच्या पक्षासह त्यांच्या नेत्यांची नावं उघड करणार असल्याचा थेट इशारा जरांगेंनी दिला आहे. सोबतच 10 फेब्रुवारीपासून आपण कठोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे. आंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

 

 

75 वर्षात जो कायदा बनला नाही, तो कायदा मराठ्यांनी मिळवला आहे

मनोज जरांगे म्हणाले होते, मुंबईला शांततेत जाऊन आरक्षण घेऊनच येणार अस म्हटलं होतं. सगेसोयऱ्याचा अध्यादेश दोन महिन्यापासून सरकार करत नव्हतं. आंदोलन पुण्यात पोहचताच सरकारकडून हालचालींना वेग आला. 15 तारखेनंतर कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. 75 वर्षात जो कायदा बनला नाही, तो कायदा मराठ्यांनी मिळवला आहे. मात्र, हे सर्व 10-20 जणांना सहन होत नाही. काहींची पोटदुखी आहे. 10 फेब्रुवारीला मी बैठक घेणार असून, त्याच दिवशी मी आमरण उपोषणाला बसणार आहे. मी कुठंही बसलो, चार भिंतीत बसलो, तरीही मी आरक्षणाचा कागद घेऊन आलोय. 10 तारखेला कठोर आमरण उपोषण करणार असल्याने शेवटचं छत्रपतींचे दर्शन घेऊन आलोय, असेही जरांगे म्हणाले. 

अधिक पाहा..

Related posts