[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mumbai Crime News : मागील काही दिवसांपासून राज्यात एकामागून एक गोळीबाराच्या घटना समोर येत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अशात माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर देखील गोळीबार झाला असून, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुंबई पोलीस अलर्ट झाले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील (Mumbai) शस्त्र परवान्यांची (Weapons License) पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून हाती घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत आदेश दिल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मुंबईत तब्बल 11 हजार 500 जणांकडे शस्त्र परवाना असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे.
अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणानंतर मुंबई पोलीस देखील अलर्ट झाले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या राजकीय व्यक्ती, व्यावसायिक तसेच सुरक्षारक्षक यांच्याकडे असणाऱ्या शस्त्राच्या परवान्याची माहिती घेण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्यांचे परवाने संपलेले आहेत किंवा ज्यांच्याकडे परवानेच नाहीत, बोगस शस्त्र परवाने बाळगणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात यावी, असेही आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळत आहे.
शस्त्र परवानाधारकांची कुंडली काढण्यास सुरूवात
मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यात परवानाधारकांची चौकशी तसेच त्यांची कुंडली काढण्यास सुरूवात झाली आहे. परवानाधारक मंडळींचे कुणाशी वाद आहेत का? ते सध्या काय करतात? ते स्वतः कुठल्या तणावात आहेत का? अशा विविध गोष्टींचा आढावा घेण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून आपापल्या हद्दीत असलेल्या शस्त्र परवाना असलेल्या लोकांची माहिती गोळा केली जात आहे.
विनापरवाना शस्त्रे वापरणाऱ्यांवर देखील कारवाई
शस्त्र परवाना नसतांना त्याचा वापर करणाऱ्या लोकांवर मुंबई पोलिसांकडून सतत कारवाई करण्यात येते. सोबतच मुंबईत गावठी कट्टे येण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. उत्तर प्रदेश, बिहारमधील अनेक परप्रांतीय कामाच्या निमित्ताने मुंबईत येत असतात. अशात काहींकडून मुंबईत गावठी कट्टे आणून विकल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. मागील काही दिवसांत हे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे कुणाकडे पिस्तुल आहे याबाबत पोलिसांना माहिती नसते. ज्यांनी शस्त्र परवाना घेतला आहे तेवढ्याच लोकांची नोंद पोलिसांकडे असते. त्यामुळे विनापरवाना शस्त्रे वापरणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिसांकडून देण्यात आल्याची माहिती येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Crime : धगधगणारी बदल्याची भावना, सरेआम गोळ्यांचा वर्षाव, थंड डोक्यानं काटा काढला जातोय; बेजबाबदार राजकारण्यांमुळे एका महिन्यातच महाराष्ट्राचा ‘गँग्ज ऑफ वासेपूर’
अधिक पाहा..
[ad_2]