Nitesh Rane On Sanjay Raut Sharad Pawar loyal dog should not bark too much Devendra Fadnavis marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nitesh Rane On Sanjay Raut : राज्यातील राजकारण आता एवढ्या खालच्या पातळीवर गेले आहे की, नेतेमंडळी एकमेकांना कुत्र्याची उपमा देत आहेत. दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यात देखील असेच काही आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. “कुत्रे तुम्ही आहात दिल्लीत जाऊन शेपटी हलवत आहात आणि महाराष्ट्रात मराठी माणसावर भुंकत आहात” असे राऊत म्हणाले होते. तर, त्यांच्या टीकेला उत्तर देतांना “शरद पवारांच्या (Sharad Pawar) निष्ठावंत कुत्र्याने जास्त भुंकू नये. नाहीतर नस बंदी करायला लागेल” असे नितेश राणे म्हणाले आहेत. 

एखाद्या गाडी खाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर बोलतांना संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. गोळीबारात मृत्यू झालेले अभिषेक घोसाळकर कुत्र्याचं पिल्लू आहे का, अभिजीत घोसाळकरांची पत्नी त्याची लहान मुलगी, त्याचे माता-पिता ही कुत्र्याची पिल्ले आहेत का?, कुत्रे तुम्ही आहात दिल्लीत जाऊन शेपटी हलवत आहात आणि महाराष्ट्रात मराठी माणसावर भुंकत आहात, असे राऊत म्हणाले. त्यांच्या टीकेला आता नितेश राणे यांनी उत्तर दिले असून, “महाराष्ट्रात कुणाचे राज्य हे सर्वांना ठावूक! …ऊबाठातील आपसी गैंगवॉरचे खापर फडणवीस साहेबांवर फोडू नका. तसेही शरद पवारांच्या निष्ठावंत कुत्र्याने जास्त भुंकू नये. नाहीतर नसबंदी करायला लागेल!… असे राणे म्हणाले. 

भाजपला महाराष्ट्रामध्ये अखेरची घरघर 

फडणवीसांवर टीका करतांना राऊत म्हणाले की, “जे म्हणत आहेत गाडी खाली कुत्र्याचा पिल्लू आला तरी हे राजीनामा मागतील. मग वागळे, सरोदे, विशंभर चौधरी यांच्या जीवाचं काही बरं वाट झालं, तर कुत्र्याचे पिल्लू मेली म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार. आमच्यावरती हल्ला करण्यासाठी भाजपच्या गुंडांना बेकायदेशीर पिस्तुला तुम्ही पुरवत आहात. लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये अखेरची घरघर लागली आहे. तर, कुत्रे तुम्ही आहात, दिल्लीत जाऊन शेपटी हलवत आहात आणि महाराष्ट्रात मराठी माणसावर भुंकत आहात, असे राऊत म्हणाले. 

सत्ताधारी पक्षाच्या सहभागातून घोसाळकरांवर गोळीबार, वडेट्टीवारांचा मोठा दावा 

दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अभिषेक घोसाळकरांवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा दावा केला आहे. “घोसाळकरांवर झालेला हल्ला, हा सत्ताधारी पक्षाच्या सहभागातून झाला हा माझा स्पष्ट आरोप आहे. तेथील काही नेते त्यांना वर्चस्व निर्माण करण्यासाठी अभिषेक घोसाळकरांची हत्या करण्यासाठी भाग पाडलं. ज्या गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, तो पूर्णप्लॅन कट होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी स्वत:वर गोळ्या झाडल्या, हे फार मोठं षडयंत्र आहे. सत्ताधारी पक्षातील जे काही प्रवक्ते आहेत, पुढे पुढे मिरवणाऱ्या मंडळींना ते पुरुष आहेत की महिला आहेत ते लवकरच कळेल, त्यांनी रचलेल्या कटाचा बळी घोसाळकर गेलेला आहे,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

 गोळीबार झालेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू, बाळू मोरेंचे मारेकरी कोण, हल्ल्याचं कारण काय? इनसाईड स्टोरी

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts