Virat Kohli Out From England Series Next 3 Tests Also Big Changes In Team India By Bcci Team Annoucement Team India Vs England Test Series Know All Updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat Kohli Vs England Test Series: टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील उर्वरित कसोटी सामन्यांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या संघात टीम इंडियाचे दिग्गज रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुल (KL Rahul) या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, टीम इंडियाचं रनमशीन असणारा विराट कोहली (Virat Kohli) मात्र, या तिन्ही सामन्यांत खेळणार नाही. इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) उर्वरित तिनही सामन्यांमधून विराट कोहली बाहेर असणार आहे. 

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, टीम सिलेक्शनमधील सर्वात मोठी अपडेट म्हणजे, पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच उर्वरित तीन सामन्यांमध्येही विराट कोहली खेळताना दिसणार नाही.  वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहली उर्वरित सामन्यांसाठी निवडीसाठी उपलब्ध नसल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीनं शुक्रवारी बीसीसीआयला याबाबत माहिती दिली. याच दिवशी निवड समितीची राजकोट, रांची आणि धर्मशाळामध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी एक ऑनलाईन मिटिंग पार पडली होती. 

विराटच्या अनुपस्थितीमागे वैयक्तिक कारण

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या सुरुवातीला कोहलीनं भारतीय कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांशी चर्चा केली होती. तेव्हा तो म्हणाला होता की, देशाचं प्रतिनिधित्व करणं, हे नेहमीच आपलं सर्वोच्च प्राधान्य आहे, परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे विराट इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळू शकणार नाही. यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही विराटच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. जय शाह म्हणाले होते की, बीसीसीआय त्यांच्या निर्णयाचा आदर करते आणि बोर्ड आणि संघ व्यवस्थापनानं त्यांना पाठिंबा दिला आहे. 

पहिल्यांदाच विराट कोहली घरच्या मैदानावरील सीरिजमधून बाहेर 

किंग कोहलीच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच तो घरच्या मैदानावरील सीरिजमधून बाहेर पडला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियानं विराटच्या अनुपस्थितीत मोठी कामगिरी करत इंग्लंडचा पराभव केला होता. टीम इंडियानं या विजयासोबतच कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. 

राहुल-जडेजाची एन्ट्री पण विराट कोहली…

इंग्लंड विरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम सिलेक्शनमधील सर्वात मोठी अपडेट म्हणजे, पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच उर्वरित तीन सामन्यांमध्येही विराट कोहली खेळताना दिसणार नाही.  वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहली उर्वरित सामन्यांसाठी निवडीसाठी उपलब्ध नसल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.

रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल या दोन्ही दिग्गज खेळाडूंचं इंग्लंडविरुद्धच्या संघात पुनरागमन झालं आहे. पण तसं असलं तरीसुद्धा फिटनेस टीमच्या मंजुरीनंतरच दोघांच्या सभागाबाबतचं चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती मिळत आहे. म्हणजेच, जाडेजा आणि राहुल संघात परतले असले तरी ते खेळतील की, नाही हे अद्याप निश्चित नाही. दरम्यान, जाडेजा आणि राहुलला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर राहावं लागलं होतं.

टीम इंडिया Vs इंग्लंड टेस्ट सीरीजचं शेड्यूल 

1st टेस्ट : 25-29 जानेवारी, हैदराबाद (इंग्लंड 28 धावांनी विजय) 
2nd टेस्ट : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टनम (टीम इंडियाचा 106 धावांनी विजय) 
3rd टेस्ट : 15-19 फेब्रुवारी, राजकोट 
4th टेस्ट : 23-27 फेब्रुवारी, रांची 
5th टेस्ट : 7-11 मार्च, धर्मशाला

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; जाडेजा, राहुलची वापसी, विराट कोहली मात्र…

[ad_2]

Related posts