[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Akola News अकोला : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या सारखे हुबेहूब दिसणारे तुळशीराम गुजर यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केलाय. वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) सर्वेसर्वा असलेल्या प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केला आहे. अकोल्यातील (Akola News) जुन्या शहरात राहणारे तुळशीराम गुजर हे हुबेहूब मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसतात. नुकतेच ते अकोला शहरातून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आंतरवाली सराटीसाठी निघाले होते. त्यापूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची अकोला येथे भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हा पक्ष प्रवेश केला आहे.
हुबेहूब मनोज जरांगे पाटील
तुळशीराम गुजर हे एक सर्वसामान्य व्यक्ती असून ते अकोला शहरातील जुने शहर वस्तीत राहतात. योगायोगाने ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी मिळते जुळते दिसतात. अनेकांना ते प्रथमदर्शनी जरांगे पाटीलच असल्याचा भास होतो. शिवाय ते हल्ली पेहराव देखील जरांगे पाटील यांच्या सारखा करतात. त्यामुळे अनेकांना आपण बघत असलेली व्यक्ती इतर कोणी नसून जरांगे पाटीलच आहेत असा समज होतो. तुळशीराम गुजर म्हणतात की, मला फार अभिमान वाटतो, की मी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सारखा दिसतो. दररोज अनेक लोक मला येऊन भटतात, माझे कौतुक करतात, माझ्यासोबत सेल्फीही घेतात. मला देखील त्यातून आनंद मिळत असल्याचे गुजर म्हणाले.
तुळशीराम गुजर हे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी चरणगाव या ठिकाणी गेले होते. इतकच नव्हे तर जरांगे पाटील यांच्या जिथे जिथे सभा झाल्या, त्या त्या ठिकाणी देखील ते उपस्थित राहिले आहे. नुकताच त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश केला आहे. राजकीय पक्षात जरी प्रवेश केला असला तरी मराठा योद्धा जरांगे पाटील यांना कायम पाठिंबा देणार असल्याचे गुजर म्हणाले.
मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा आमरण उपोषण
मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या नवीन अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याने मनोज जरांगे आज पासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहे. याबाबत जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला इशारा देखील देण्यात आला आहे. मुंबईतील (Mumbai) आंदोलनादरम्यान सरकारने मराठा आरक्षणाबाबत नवीन अध्यादेश काढल्याने मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन थांबवले होते. मात्र, सरकारने या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करावी, अशी मागणी सुद्धा मनोज जरांगे यांनी केली होती. मात्र, अंमलबजावणी होत नसल्याने आजपासून आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे आमरण उपोषण सुरू करणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
[ad_2]