IND Vs AUS U19 Final U 19 World Cup 2024 Uday Saharan VS Hugh Weibgen Sports News Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs AUS U19 Final : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (IND vs AUS) पुन्हा एकदा वर्ल्डकपचा अंतिम सामना रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 (U19 World Cup) संघांनी फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे भारताच्या ‘उदय ब्रिगेड’कडे जुना वचपा काढण्याची संधी आली आहे. हा सामना रविवारी (दि.11) बनोनीच्या विलमूर पार्कवर खेळवण्यात येणार आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 2 विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. तर ऑस्ट्रेलियाने उपांत्यफेरीत पाकिस्तानचा 1 गडी राखत पराभव केला होता. 

एका वर्षांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा फायनल सामना 

या वर्षात भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान हा तिसरा फायनल सामना खेळवला जाणार आहे. यापूर्वी खेळवण्यात आलेल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 7 ते 11 जुलै दरम्यान लंडन येथील ओवलच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 209 धावांनी धु्व्वा उडवला होता. 


ऑस्ट्रेलियाकडून 2023 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभव 

दरम्यान, त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया 2023 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा आमने-सामने आली. मात्र, या सामन्यातही कांगारुंनी भारताचा 6 गडी राखून पराभव केलाय. या पराभवाने तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचे टीम इंडियाचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. पराभव झाल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंच्या सर्व खेळाडूंच्या डोळ्यांत अश्रू पाहायला मिळाले. या सर्वांचा वचपा काढण्याची संधी टीम इंडियाच्या उदय ब्रिगेडकडे आली आहे. 

फायनलमध्ये भारताचे पारडे जड

अंडर 19 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दोनदा आमने-सामने आले आहेत. या दोन्ही वेळेस भारताने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवलाय. आता तिसऱ्यांदा दोन्ही संघ आमने सामने असणार आहेत. यापूर्वी भारताने 2018 आणि 2012 मध्ये अंडर 19 वर्ल्डकपवर नाव कोरले होते.

अंडर 19 च्या वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी टीम 

टीम इंडिया ही अंडर 19 च्या वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी टीम आहे. 2008, 2000, 2012, 2018,2022 अशा पाच वेळेस टीम इंडियाने जेतेपदावर नाव कोरले. तर भारतीय संघ 2016 आणि 2020 मध्ये उपविजेताही ठरला होता. भारताची नजर आता सहाव्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरण्याकडे आहे. 
 

इतर महत्वाच्या बातम्या 

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; जाडेजा, राहुलची वापसी, विराट कोहली मात्र…



[ad_2]

Related posts