Chhagan Bhujbal suggests leaders with Sharad Pawar to rethink about their decision

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chhagan Bhujbal On Maratha Reservation : पुण्यात (Pune) आज अजित पवार गटाकडून युवक मेळावा आयोजित करण्यात आला असून, यावेळी बोलतांना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत आपली भूमिका पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व्यासपीठावर असतानाच भुजबळ यांनी आरक्षणाचा मुद्दा मांडला. तसेच, मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणावर बोलतांना स्पष्ट भूमिका मांडली. 

यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचे वादळ उठलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका आपली पहिल्यापासून आहे. 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान मराठा आरक्षण संदर्भात नवा कायदा येतोय. त्याला आपला खंबीर पाठिंबा आहे. लहान-सहान सर्वांना सोबत घेऊन पुढं जावं लागेल. अजित दादांना मुख्यमंत्री करण्याचं आपलं स्वप्न आहे. यासाठी अल्पसंख्याक ही सोबत घेऊन जावं लागेल. कोणावर ही अन्याय होता कामा नये. जीभ घसरली तर अवघड होतं. शांततेत काम करावं लागणार आहे. अजित दादांच्या नेतृत्वात आपल्याला एक नंबर राहायचं असल्याचे भुजबळ म्हणाले आहे. 

शरद पवार गटातील नेत्यांना सल्ला….

“आमच्या जुन्या मित्रांनी आणि नेत्यांनी पुनर्विचार करायला हवं. पुनर्विचार केला नाही तर किमान थांबायला हवं. तुमच्या पुढं काय ठेवलंय ते पहा. मी पण पक्षाच्या जन्मापासून होतो. मात्र, आता महिला, पुरुष आणि तरुणांचे जे संघटन अजित दादांच्या माध्यमातून उभारलं आहे, ते पहा आणि पुनर्विचार करा,” असा सल्ला भुजबळ यांनी शरद पवार गटातील नेत्यांना दिला आहे… 

 

[ad_2]

Related posts