Sanjay Raut on Ashok Chavan says Ashok Chavan gave slogan that BJP is better than jail for the single slogan of corruption( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut on Ashok Chavan : आता नवा नारा आला आहे, ष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा. ज हा नारा अशोक चव्हाण यांनी दिला, अशी सडकडून टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचली. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी अशोक चव्हाणांचा जांगलाच समाचार घेतला. त्यांनी अब्दुल सत्तार यांचाही खोचक शब्दात समाचार घेतला. 

ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीला विस्मरणाचा रोग झाला आधी काय बोललो होतो ते त्यांना आठवत नाही. दोन-तीन वर्षांपूर्वी मोदींनी नांदेडमध्ये जाऊन अशोक चव्हाणांविरोधात भाषण केलं होतं. अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे ते सांगितलं होतं. संजय राऊत यांनी त्याच भाषणाची क्लीप व्यासपीठावर ऐकवली. देवेंद्र फडणवीस यांनी देखील जे बोलले होते त्याची क्लिपही ऐकवली. 

अब्दुल सत्तार नावाचा चोर जेलमध्ये असेल

संजय राऊत यांनी अब्दुल सत्तार यांच्यावरही तोफ डागली. अब्दुल सत्तार नावाचा चोर पुढील चार महिन्यात जेलमध्ये असेल. आपलं सरकार येईल आणि किमान 12 महिने जेलमध्ये असेल, असा इशारा राऊत यांनी दिला. 

तत्पूर्वी, बोलताना माजी मंत्री चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा चंद्रकांत खैरे यांच्यावर तोफ डागली. खैरे यांनी सत्तार यांच्या विरोधात ईडीकडे 17 हजार पानांचा पुरावा दिला होता तो गठ्ठा दाखवला. ईडीवर यावर कोणती कारवाई करणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. भुमरे मला म्हणतात की मी काम केलं नाही. मी मंदिर उभा केलं, पण दारूची दुकाने उघडली नाही, अशी टीका करताना खैरे यांनी भूमऱ्या असा उल्लेख केला. पोलिस पालकमंत्री यांचं ऐकत असेल, तर आम्हाला कोर्टात जावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

Related posts