District Collector and Superintendent of Police met Manoj Jarange Patil  

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarnge Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarnge Patil) यांनी गेल्या तीन दिवसापासून आमरण  उपोषण सुरु केलं आहे. या तीन दिवसात त्यांनी पाण्याचा थेंब देखील घेतला नाही. तसेच, उपचार घेण्यासाठी देखील जरांगे यांनी नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची तब्येत देखील खालावली आहे. अशातच आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) मध्ये मनोज जरांगे यांची जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी भेट घेतली. तसेच त्यांना पाणी घेण्याची विनंती केली. मात्र, सगे सोयरे याबाबत अंमलबजावणी करा तरच उपोषण सोडू, तोपर्यंत पाणी घेणार नसल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय. 

15 दिवस उलटूनही अध्यादेशाची अंमलबजावणी नाही

मनोज जरांगे यांनी गेल्या महिन्यात थेट मुंबईत धडक दिली होती. मात्र, वाशीवरच त्यांचे आंदोलन थांबवत सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयरेबाबत अध्यादेश काढला होता. सोबतच पंधरा दिवसांत या अध्यादेशाची अंमलबजावणी होण्याचं देखील आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, पंधरा दिवस उलटून गेल्यावर देखील या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या याच उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती देखील खालावत आहे.

जरांगे पाटील यांचं आंतरवाली सराटीमध्ये चौथ्यांदा उपोषण सुरू 

मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये चौथ्यांदा उपोषण सुरू केले आहे. यापूर्वी त्यांच्या याच उपोषणास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळायची. दरम्यान, 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केल्याने आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा गर्दी होतांना पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठा आंदोलक जरांगे यांची भेट घेण्यासाठी येत आहे. सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. मात्र, अजूनही सरकारकडून त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी कुणीही आलं नसल्याचं किंवा संपर्क साधण्यात आले नसल्याचं जरांगे म्हणाले आहे. दरम्यान, पंधरा दिवस उलटून गेल्यावर देखील या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण सुरू केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

थोडी लाज ठेवा, कुत्रा चावल्या सारखं बोलू नका; मनोज जरांगे विजय वेडट्टीवारांवर संतापले

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts