Police identified 36 Pro Naxal organizations in state Efforts to curb urban Naxalism Nagpur marathi news( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर : सध्या महाराष्ट्रातील नक्षल विरोधी अभियानाच्या रडावर शहरी नक्षलवाद आहे. नक्षल (Naxal) समर्थक असलेल्या राज्यातील 36 संघटनांची पोलिसांनी ओळख केली पटवली असून, त्यावर पाळत ठेवली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या हाती लागलेल्या कागदपत्रांवरून शहरी नक्षलवाद्यांनी राज्यातील प्रमुख शहरात मजबूत संघटन उभारल्याचे नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील यांनी सांगितले आहे. 

संदीप पाटील यांनी म्हटले आहे की, “सीपीआय (माओवादी) या नक्षलवाद्यांच्या संघटनेत पीपल लिबरेशन गोरिला आर्मी व युनाटेड फ्रंट या दोन शाखा आहे. युनायटेड फ्रंट हा शहरी भागात काम करत असून, शहरात पार्टी कमिटी, पार्टी फ्रॅक्शन व पार्टी सेलच्या माध्यमातून तीन स्तरावर काम चालते. या नेटवर्कने महाराष्ट्रात झालेल्या भीमा कोरेगाव आंदोलन, बारसू रिफायनरी, आरे कारशेड या आंदोलनामध्येमध्ये आपली सक्रिय उपस्थिती नोंदविल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले. त्यामुळे शहरी नक्षलवादाचा धोका लक्षात घेता सरकार या संदर्भात कडक कायदा आणण्याच्या तयारीत असल्याचे,” संदीप पाटील यांनी सांगितले. 

महत्वाच्या शहरातील झोपडपट्ट्यांवर लक्ष…

मागील काही दिवसांत नक्षलवाद्यांना स्थानिकांचा पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र आहे. तसेच आदिवासी भागातील ग्रामीण तरुण देखील नक्षलवादाकडे यायला तयार नाही. परिणामी नक्षलवाद्यांना नव्या भरतीची मोठी अडचण निर्माण झाली आहे.  त्यामुळेच नक्षलवाद्यांनी आता मोठ्या प्रमाणात शहरी भागाकडे आपला मोर्चा वळवला आहे. यासाठी त्यांनी राज्यातील शहरातील झोपडपट्ट्यांना केंद्रित करत नक्षलवादासाठी नव्या भरतीची मोहीम सुरू केल्याचे समोर येत आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि गोंदिया या पाच शहरातून नक्षलवाद्यांनी झोपडपट्ट्यामधून तरुणांचे ब्रेन वॉश करत त्यांना नक्षलवादाकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय असून, पोलिसांकडून त्या दृष्टीने पाऊलं उचलले जात आहेत. 

शहरी नक्षलवाद्यांचा वाढता धोका!

  • नक्षलवाद्यांशी संबंधित काही गोपनीय डॉक्युमेंट्सनुसार राज्यातील पाच शहरं शहरी नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर आहे.
  • मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि गोंदिया या शहरात नक्षलवाद्यांनी त्यांचा नेटवर्क मजबूत केल्याचे मान्य केले आहे.
  • या शहरातून शहरी नक्षलवादी झोपडपट्टीत राहणाऱ्या तरुणांना ब्रेन वॉशकरून नक्षलवादाकडे नेण्याचा प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे.
  • गरीबी, अशिक्षण, आणि शासनाच्या विविध योजनांचा अपयश या मुद्द्यांवरून तरुणांचं ब्रेन वॉश केले जात आहे.
  • पुढे त्यांना छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या नक्षल प्रभावित भागांमध्ये लढण्यासाठी पाठवले जाते.
  • यासाठी काम करणारे 34 संघटना पोलिसांच्या रडारवर असून, त्यांच्या कामावर करडी नजर ठेवली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

नवीन भरतीसाठी मुंबई, पुणेसह मोठ्या शहरातील झोपडपट्ट्यांमधील तरुण नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर

अधिक पाहा..

Related posts