माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचं निधन, भारतीय क्रिकेटवर शोककळा! 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dattajirao Gaekwad Passes Away : भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचं बडोद्यामध्ये निधन झालं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताचा माजी खेळाडू इरफान पठाण यानं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. दत्ताजीराव गायकवाड यांनी 1952 मध्ये इंग्लंड दौऱ्यात कसोटीमध्ये पदार्पण केले होते. दत्ताजीराव गायकवाड यांनी मुंबई विद्यापीठ आणि बडोद्यात महाराजा सयाजी विद्यापीठाकडून क्रिकेट करिअरला सुरुवात केली होती. 

दत्ताजीराव गायकवाड यांनी भारतासाठी 11 कसोटी सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्यांनी 18.42 च्या सरासरीने 350 धावा केल्या. 1952 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात त्यांनी कसोटीमध्ये पदार्पण केले होते. 1959 मध्ये इंग्लंड दौऱ्यात त्यांनी भारतीय संघाची धुरा पाहिली होती. त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाला 5-0 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. दत्ताजी कायकवाड यांनी 1947 ते 1961 यादरम्यान क्रिकेटमध्ये नशीब अजमावले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 14 शतकांची नोंद आहे. महाराष्ट्राविरोधात 249 धावांची खेळी केली होती. 2016 मध्ये दत्ताजीराव गायकवाड भारताचे वयस्कर कसोटी क्रिकेटर झाले होते. त्यांच्याआधी दीपक शोधन भरत सर्वात वयस्कर क्रिकेटर होते. शोधन यांचं वयाच्या 87 व्या वर्षी अहमदाबादमध्ये निधन झालं होतं.  

 दत्ताजीराव गायकवाड यांना क्रिकेटच्या मैदानावर DK म्हणून ओळखलं जायचं. दत्ताजी गायकवाड यांनी 1952 ते 1961 या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान गाजवलं होतं.  बचावात्मक फलंदाजी आणि वेळ पडल्यास फटकेबाजी करण्यासाठी दत्ताजी गायकवाड यांना ओळखलं जायचं.  दत्ताजी गायकवाड यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली शानदार कामगिरी केली. 1957-58 या रणजी चषकाच्या हंगामात बडोद्याला जेतेपद मिळवून दिले. हे दशकभरानंतर मिळालेले जेतेपद होते. दत्ताजी गायकवाड यांनी अंतिम सामन्यात सर्व्हिसेसविरुद्धच्या 132 धावा चोपल्या होत्या.  1961 मध्ये चेन्नई ते येथे पाकिस्तान विरुद्धचा शेवटचा सामना खेळले होते. 



[ad_2]

Related posts