Ashok Chavan Joins BJP devendra fadanvis talok about asok chaan rajya sabha maharshtra polotics marathi news | अशोक चव्हाणांची मदत कुठे घ्यायची आम्हाला चांगलेच माहित

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ashok Chavan Joins BJP: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचं कौतुक केले.  आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. राज्यातलं एक जेष्ठ नेतृत्त्व भाजपमध्ये प्रवेश करत आहे. ज्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणूक गाजवली. विविध मंत्रीपद भूषवली, दोनवेळा जे राज्याचे मुख्यमंत्री झाले, ते अशोक चव्हाण आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाणांची मदत कुठे घ्यायची आम्हाला चांगलेच माहित असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.  

अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, अशोक चव्हाण यांची मदत कुठे घ्यायची हे आम्हाला माहिती आहे. अशोक चव्हाण यांचा अनुभव राहिलेला आहे त्याचा आम्ही फायदा घेऊयात. राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा आमचं केंद्र करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अनेक नेते आमच्या संपर्कात- देवेंद्र फडणवीस

आम्ही टार्गेट घेऊन चालत नाही. जे नेते योग्य वाटतात त्यांच्याशी आमची चर्चा आहे. हे खरं आहे काही नेते आमच्या संपर्कात आहेत. जमिनीशी जोडलेल्या नेत्याशी आमचा संपर्क सुरू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाण दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले. त्यांचा रोल काय असेल याबाबत केंद्र सरकारसोबत बोलून निर्णय घेतला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काँग्रेसला पक्ष सांभाळता येत नाही – देवेंद्र फडणवीस

काँग्रेसला त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही. आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली हे कळत नाही. देशातील मुख्य धारेत जायला पाहिजे असे मुख्य नेत्याना वाटते म्हणून नेते आमच्याकडे येत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

हा माझा व्यक्तिगत निर्णय – अशोक चव्हाण

मी कधीही कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही आणि करणार नाही. सभागृहात विरोधी भूमिका मी प्रमाणिक पणे केली. सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांशी सबंध होते ती एक परंपरा आहे. पक्ष जे आदेश देतील ते मला मान्य असतील. जे मला सांगितले जाईल त्यानुसार मी काम करीन. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कुणी जा असे सांगितले नाही. मी अधिक भाष्य करणार नाही, योग्य वेळी बोलीन, असे अशोक चव्हाण म्हणाले. 

आणखी वाचा :

Ashok Chavan Live : आता व्यक्तिगत टीका करणार नाही, वेळ आल्यावर बोलेन – अशोक चव्हाण

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts