Rajya Sabha Election 2024 The struggle for Rajya Sabha candidate from aiit pawar NCP faction is still going on( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajya Sabha Election 2024 : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Rajya Sabha Election 2024) अजित पवार गटाची (Ajit Pawar) बैठक सुरू झाली. या बैठकीमध्ये अजित पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आजच्या बैठकीला सर्व आमदारांना बोलवण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल यावर चर्चा झाली. यानंतर उमेदवारी अर्जावर आठ आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. आमदारांसोबत चर्चा झाल्यानंतर आता वरिष्ठ नेते एकत्र बसून आपला उमेदवार निश्चित करतील. उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून आठ आमदारांनी सह्या केल्या आहेत

देवगिरी या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीसाठी मंत्री छगन भुजबळ, अमोल मिटकरी, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी नेते उपस्थित होते. प्रफुल पटेल यांच्यासह बाबा सिद्दीकी सुद्धा देवगिरी बंगल्यावर पोहोचले. त्यामुळे या बैठकीत राज्यसभेचा उमेदवार निश्चित होणार का? याची चर्चा होती. राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. छगन भुजबळ यांच्याकडून ओबीसी समाजाला राज्यसभेची मागणी करण्यात आली आहे. भुजबळ राज्यसभेची जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव तंत्र वापरत असल्याची चर्चा सुरू आहे. 

दुसरीकडे नवाब मलिक यांनी सुद्धा राज्यभेसाठी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी सुद्धा पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. आनंद परांजपे यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. पार्थ पवार यांच्याकडून गोविंद अदिक यांचे पुत्र अविनाश यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे लक्ष आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुद्धा नावाची चर्चा सुरू आहे. ते राज्यसभेवर गेल्यास त्यांना पक्षासाठी जास्त वेळ देता येईल असं बोललं जात आहे.जर सुनील तटकरे यांना राज्यसभेवर पाठवलं, तर रायगड लोकसभेवरील क्लेम राष्ट्रवादीनं सोडला की काय? अशी चर्चा होऊ शकते. त्यामुळे महायुतीत या जागेबाबत नेमका काय निर्णय घेतला जातो? याकडे राष्ट्रवादी लक्ष ठेवून आहे. 

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांची संख्या 

  • भाजप : 104
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) : 42 
  • शिवसेना (एकनाथ शिंदे गट): 40
  • काँग्रेस : 45
  • शिवसेना उद्धव ठाकरे गट : 16 
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 11
  • बहुजन विकास आघाडी : 3 
  • समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ती प्रत्येकी 2
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी 1 आणि अपक्ष 13

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

Related posts