अयोध्येत काँग्रेस नेत्यांना विरोध; लोकांकडून धक्काबुक्की, भक्त आणि कार्यकर्ते भिडले

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर रामभक्तांसह संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. उत्सुकतपोटी अयोध्येत नागरिकांची गर्दी होत आहे. पण दुसरीकडे राम मंदिरावरुन राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. काँग्रेस नेत्यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारलं असून, हा धार्मिक नव्हे तर राजकीय कार्यक्रम असल्याची टीका केली आहे. यादरम्यान अयोध्येत काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता तेथील लोकांसोबत त्याची झडप झाली.  काँग्रेस कार्यकर्ते आणि भक्तांमध्ये ही हाणामारी झाली. यावेळी लोकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातातून…

Read More