[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Sharad Pawar on PM Modi : देशात रोज 60 ते 65 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, पण हे सरकार ढुंकून बघत नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांच्याकडेही सरकार ढुंकून बघत नाही. शेतात वाढलेलं तण उपटून फेकतो तसं हे सरकार उखडून टाकावं लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. पुण्यात (Pune) महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटचा भव्य मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते.
माईक हातात मिळताच नेहरूंवर टीका करतात; शरद पवारांचा पीएम मोदींवर घणाघात
शरद पवार म्हणाले, या देशाला दिशा देण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, त्यांच्याबद्दल घृणा पसरवण्याचा प्रयत्न मोदी (PM Narendra Modi) करत आहेत. जवाहरलाल नेहरू यांनी देशात संसदीय लोकशाही मजबूत केली, जगात देशाची प्रतिष्ठा वाढवली, संपूर्ण जग हे मान्य करत आहे. पण मोदी मान्य करत नाहीत. माईक हातात मिळाला की नेहरुंवर टीका करतात, असा घणाघातही शरद पवारांनी केला.
‘देशात रोज 60 ते 65 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, पण हे सरकार ढुंकून बघत नाही’
पुढे बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, ज्याप्रमाणे शेतात वाढलेलं तन आपण उपटून फेकतो तसं हे सरकार उखडून टाकावं लागेल.देशात रोज 60 ते 65 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, पण हे सरकार ढुंकून बघत नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांच्याकडे सरकार ढुंकून बघत नाही.
‘राज्यांबद्दल मोदी सरकारची भूमिका असहकार्याची आहे’
संविधानावर आधारित लोकशाही विषयीची चिंता मागील 10 वर्षांत वाटू लागली आहे. राज्यांबद्दल मोदी सरकारची भूमिका असहकार्याची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बँकेत भ्रष्टाचार केला असा आरोप केंद्र सरकारने केला. त्यांनी हा भ्रष्टाचार उघडकीस आणून कारवाई करावी, असं माझं आव्हान आहे, असेही शरद पवार (Sharad Pawar) यावेळी बोलताना म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशिर्वादाने किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडलेल्या ‘पक्ष चिन्ह अनावरण’ सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
राजमाता जिजाऊ, शिवछत्रपती आणि या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे शिवप्रेमी कार्यकर्ते बंधू-भगिनींनो..!
आजचा दिवस हा आपल्या… pic.twitter.com/QvectYJuTQ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 24, 2024
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
[ad_2]