[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Madhya Pradesh Habibganj Railway Station : देशात सध्या सर्वच बाबतील आधुनिकीकरण होताना दिसत आहे. रेल्वे सेवाही यामध्ये मागे नाही. नागरिकांचा प्रवास सुकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडूनही आधुनिकीकरणावर भर दिला जात आहे. मेट्रो, मोनो नंतर देशात सुस्साट धावणार वंदे भारत ट्रेनही सुरु झाली आहे. इतकंच नाही तर देशात आता जागतिक सुविधा असलेलं खाजगी रेल्वे स्थानकही उभारण्यात आलं आहे.
देशातील पहिलं खाजगी रेल्वे स्थानक
जागतिक दर्जाच्या सुविधा असलेलं देशातील पहिलं खाजगी रेल्वे स्थानक उभारण्यात आलं आहे. देशातील हे पहिलं खाजगी रेल्वे स्टेशन मध्य प्रदेशात आहे. हे रेल्वे स्थानक सरकारने 45 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिलं आहे. देशातील हे पहिलं खाजगी स्टेशन एखाद्या 5 स्टार हॉटेलसारखे दिसतं.
भारतातील पहिलं खाजगी रेल्वे स्टेशन
देशातील पहिलं खाजगी रेल्वे स्टेशन हबीबगंज आहे, हे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आहे. 2021 मध्ये या स्टेशनचे नाव हबीबगंज (Habibganj) ऐवजी बदलून राणी कमलापती रेल्वे स्टेशन (Rani Kamlapati Railway Station) करण्यात आलं होतं. IRDC (Indian Railways Development Corporation) ने दिलेल्या माहितीनुसार, हे रेल्वे स्थानक सरकारसोबत खाजगी कंपनीने भागीदारी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित केलं गेलं आहे.
कोणत्या कंपनीकडे या स्थानकाचं काम
मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय रेल्वेने बन्सल समुहासोबत (Bansal Group) करार करून हे रेल्वे स्टेशन विकसित करण्याची जबाबदारी दिली होती. स्थानकाच्या उभारणीसोबतच आठ वर्षांच्या देखभाल आणि संचालनाची जबाबदारीही बन्सल ग्रुपवर आहे. रिपोर्टनुसार, हे स्टेशन 45 वर्षांसाठी कंपनीने भाडेतत्वावर घेतलं आहे. बन्सल समूह या विकासासाठी 100 कोटी रुपये खर्च करेल. या सोबतच स्टेशनच्या आजूबाजूचा परिसरही बन्सल समुहाने भाडेतत्त्वावर घेतला असून त्यासाठीही कंपनी कोट्यवधी खर्च करणार आहे.
रेल्वे स्थानकावर जागतिक दर्जाच्या सुविधा
या रेल्वे स्थानकावर शॉपिंग स्टोअर्स, रेस्टॉरंट्स, केटरिंग शॉप्स आणि पार्किंग इत्यादी अनेक प्रकारच्या सुविधा देखील समाविष्ट आहेत. महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र सुविधाही आहेत. या स्थानकावर ऊर्जेसाठी सोलर पॅनलही बसवण्यात आले असून, त्यातून मिळणारी ऊर्जा स्थानकाच्या कामांसाठी वापरली जाणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुविधा
मीडिया रिपोर्टनुसार, कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना 4 मिनिटांत स्टेशनबाहेर काढता येईल, अशा प्रकारे हे स्टेशन बनवण्यात आले आहे. यामुळे कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे प्राण वाचवता येऊ शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
[ad_2]