[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पाटणा : भगवान शंकराची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अष्टयाम नृत्य करताना गळ्याभोवती गुंडाळलेल्या सापानेच कलाकाराला दंश केला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत तरुणाने अखेरचा श्वास घेतला होता. बिहारमध्ये ही हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे.
मुरलीगंज नगर पंचायतीच्या दुर्गास्थान येथे अष्टयाम नृत्य सादर करत असताना एका कलाकाराचा सर्पदंशाने मृत्यू झाला. घटनेनंतर आयोजक आणि इतर कलाकार कार्यक्रम अर्धवट सोडून पळून गेले.
मुरलीगंज नगर पंचायतीच्या दुर्गास्थान येथे अष्टयाम नृत्य सादर करत असताना एका कलाकाराचा सर्पदंशाने मृत्यू झाला. घटनेनंतर आयोजक आणि इतर कलाकार कार्यक्रम अर्धवट सोडून पळून गेले.
मुरलीगंज सार्वजनिक दुर्गास्थान मंदिर परिसरात आयोजित अखंड अष्टयामावेळी नृत्य करण्यासाठी आलेल्या एका कलाकाराचा सर्पदंशाने मृत्यू झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा अष्टयाममध्ये एक कलाकार भगवान शंकराच्या वेशात गळ्यात खराखुरा साप घालून नाचत होता. यावेळी सापाने कलाकाराला दंश केला.
सर्पदंशानंतर त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला तातडीने मुरलीगंज पीएचसीमध्ये आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला अन्यत्र रेफर केले. मात्र उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाल्याचे घटनास्थळी उपस्थित डॉक्टर लाल बहादूर यांनी सांगितले. इमर्जन्सी वॉर्डच्या बेडवर मृतदेह तसाच टाकून आयोजक फरार झाले.
[ad_2]