Chairman Of Central Water Commission Kushvinder Vohra Launches Mobile App Floodwatch To Provide Real-Time Flood Forecasts To Public Know In Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Real Time Flood Watch App : सध्या महाराष्ट्रासह देशभरात पावसानं हजेरी लावली आहे. पावसाचा जोर अचानक कधी वाढेल काही सांगता येत नाही. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती पाहायला मिळते आणि अचानक येणााऱ्या पुरामुळे अनेकदा स्थानिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं. हेच नुकसान टाळण्यासाठी सरकारतर्फे एक अॅप बनवण्यात आले आहे. रियल टाईम फ्लड वाॅच अॅप (Real Time Flood Watch App) असं या अॅपचं नाव आहे. पूरस्थितीपासून वाचण्याकरता सरकारने या तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. केंद्र सरकारने गुरूवारी प्रभावित भागात पूर परिस्थितीची रिअल टाईम माहिती देण्यासाठी हे अॅप लाँच केले आहे. अनेक राज्यांमध्ये पूर आणि पावसाने मोठा कहर केला असून कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. 

केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष कुशविंदर वोहरा म्हणाले की, फ्लडवाॅच अॅप  23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 338 ठिकाणांहून रिअल टाईममध्ये पुराशी संबंधित माहिती पाठवण्याकरता फायदेशीर ठरेल. त्याकरता हवा असणारा संपूर्ण डेटा या अॅपच्या मदतीने एकत्र केला जाऊ शकतो. फ्लडवाॅच लाँच करत असताना वोहरा म्हणाले की, या अॅपचा वापर करून तुम्ही पुराशी संबंधित माहिती त्या-त्या भागातील लोकांना देऊ शकता. या अॅपच्या मदतीने तुम्ही सात दिवसांच्या आधी पूराचा अंदाज देऊ शकता. हे अॅप वेळेवर आणि अगदी अचूक माहिती देण्यास परिपूर्ण आहे. 

पुढे ते म्हणाले की, हे अॅप वापरण्याकरता खूप सोपे असणार आहे. ज्यामुळे प्रत्येकाकरता पुरासंबंधित माहिती मिळवणे सोपे होणार आहे. त्यामुळे अनेक भागांतील पुराचा धोका कमी होऊ शकतो. फ्लडवाॅच मेसेज आणि व्हिडीओ या दोन्ही पद्धतीने तुम्हाला संदेश देऊ शकतो. सध्या हे अॅप केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. ते लवकरच आता इतर भाषेत लोकांकरता उपलब्ध होणार आहे. पूरग्रस्त भाग असणाऱ्या हिमाचल  प्रदेशात हे अॅप अजून लोकांकरता सुरू करण्यात आले नाही, पण लवकरच ही सेवा त्याठिकाणी सुरू होणार आहे. 

जर तुम्हाला हे अॅप वापरायचे असेल तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये प्ले स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करू शकता. आवश्यक त्या परवानग्या दिल्यानंतर हे अॅप पूरसदृशस्थिती दाखवेल. या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या आजूबाजूला कुठे आणि कोणत्या भागात पूर येऊ शकतो  हे समजू शकते. 

इतर महत्वाच्या बातम्या :

BMC Covid Scam : कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; पाच दिवसांच्या EOW कोठडीत रवानगी



[ad_2]

Related posts