Ind Vs Ire Team India 1st T20 Match Against Ireland IPL 2023 Match Winner Player From Maharashtra Jitesh Sharma And Ruturaj Gaikwad In Indian Cricket Team

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs IRE, 1st T20: आज टीम इंडिया (Team India) आणि आयर्लंड (Ireland) यांच्यात पहिला टी-20 सामना खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यात अनेक नवख्या खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळणार आहे. आयर्लंड विरुद्धच्या संघात महाराष्ट्राचा मराठमोळा स्टार क्रिकेटर ऋतुराज गायकवाड खेळताना दिसणार आहे. पण, ऋतुराज गायकवाडसोबतच आणखी एक महाराष्ट्राचा शिलेदार खेळताना दिसणार आहे. आपल्या दमदार खेळीनं आयपीएल गाजवणारा जितेश शर्मा आजच्या सामन्यातून आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात पदार्पण करणार आहे. जितेश शर्मा मुळचा अमरावतीचा. आयपीएलपूर्वी जितेशनं भारतामधील काही स्थानिक स्पर्धांमध्येही मैदान मारलं होतं.  

जितेश शर्मा टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं बोललं जात आहे. त्याच सर्वात मोठं कारण म्हणजे, जितेश शर्मा दुहेरी भूमिका बजावू शकतो. जितेश धमाकेदार फटकेबाजी करतोच, पण त्यासोबतच तो एक उत्तम विकेटकिपरही आहे. त्यामुळे आयर्लंड विरुद्धच्या दौऱ्यात जितेश शर्माची निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 

बुमराहवर खिळल्यात सर्वांच्या नजरा 

टीम इंडिया आणि आयर्लंड  यांच्यातील 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना आज, 18 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता डब्लिन येथे खेळवला जाईल. आयर्लंडविरुद्धच्या या महत्त्वाच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाच्या नव्या खेळाडूंचं नशीब उघडू शकतं. आजच्या सामन्यातून संघ व्यवस्थापनानं काही नव्या खेळाडूंचं पदार्पण करण्याची योजना तयार केली आहे. जवळपास 11 महिने मैदानापासून दूर राहिल्यानंतर पुनरागमन करणारा जसप्रीत बुमराह आजपासून आयर्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवणार आहे. कित्येत महिन्यांनी बुमराहला मैदानात खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. 

पहिल्या टी20 मध्ये ‘या’ खेळाडूंचं नशीब उजळणार 

भारतीय क्रिकेट संघात आयपीएल स्टार ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंह आणि जितेश शर्मा आहेत. पण सर्वांच्या नजरा बुमराहवरच असतील. दोन महिन्यांनंतर टीम इंडियात सुरू होत असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत हा वेगवान गोलंदाज भारताच्या रणनीतीचा अविभाज्य भाग आहे. 29 वर्षीय बुमराहला गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेत कंबरेला स्ट्रेस फ्रॅक्चर झालं होतं. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून बुमराह मैदानापासून दूर होता. आता तो संघात पुनरागमन करणार आहे. 

टीम इंडियाचा नवख्या खेळाडूंच्या डेब्यूचा प्लान

त्याला पाच दिवसांत तीन सामन्यांत जास्तीत जास्त 12 ओव्हर्स टाकावे लागतील. या सीरिजमधून मुख्य सिलेक्टर अजित आगरकर, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना मॅच फिटनेसच्या बाबतीत बुमराहचा फॉर्म काय आहे, हे समजण्यास मदत होणार आहे. दरम्यान, 50 ओव्हर्सचं स्वरूप पूर्णपणे भिन्न आहे. कारण त्याला दोन, तीन किंवा चार ओव्हर्सच्या स्पेलमध्ये दहा षटकं टाकावी लागतील.

आयर्लंड सीरिजसाठी टीम इंडिया 

जसप्रीत बुमराह (कर्णधार), रिंकू सिंह, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल, शाहबाज अहमद, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), अर्शदीप सिंह, आवेश खान, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, रवी बिश्नोई.

[ad_2]

Related posts