[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>इंदूरमधील खजराना पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ वादातून गोळीबाराची घटना घडलीय. यात दोघांचा मृत्यू झालाय तर सहा जण जखमी झालेत. इंदूरच्या कृष्णबाग कॉलनीत काल रात्री ११च्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबाराचा व्हिडीओदेखील समोर आलाय. गोळीबार करणारा गार्ड असल्याची माहिती मिळतेय. गार्ड राजपाल रात्री ११च्या सुमारास कुत्रा फिरवत होता. त्यावेळी आणखी एक कुत्रा आला आणि दोन्ही कुत्रे भुंकू लागले. यावरून राहुल कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. हा वाद इतका वाढला की राजपाल थेट घरी गेला आणि राहुल कुटुंबीयांवर गोळीबार केला. यात राहुल यांच्या कुटुंबातील दोघाचा मृत्यू तर याच कुटुंबातील सहा जण जखमी झाले असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. </p>
<p> </p>
[ad_2]