[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या जी-20 परिषदेचा आजचा दुसरा दिवस आहे. तर आज भारत आणि पाकिस्तानमध्ये आशिया कपातील दुसरा सामना रंगणार आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असल्यामुळे नागरिकांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहून बाहेर पडावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय. तर अजित पवार यांनी कोल्हापुरात उत्तरदायित्व सभा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे हे आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत.
जी-20 परिषदेचा दुसरा दिवस
नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या जी-20 परिषदेचा आजचा दुसरा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज 9 देशांच्या प्रमुखांची भेट घेणार आहेत. तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत ते द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना
आशिया चषकात आज भारत आणि पाकिस्तानमध्ये दुसरा सामना होणार आहे. पहिला सामना हा पावसामुळे रखडला. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. श्रीलंकेतील कोलंबोमध्ये हा सामना होणार आहे. तर भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता हा सामना सुरु होईल.
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर मेगाब्लॉक असेल तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. तसेच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
कोल्हापुरात अजित पवारांची उत्तरदायित्व सभा
कोल्हापुरात अजित पवारांची उत्तरदायित्व सभा पार पडणार आहे. यावेळई जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येईल. सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली तपोवन मैदानावर सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होईल.यावेळी उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अजित पवार यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे जळगावात
पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभासाठी उद्धव ठाकरे आज जळगावमध्ये जाणार आहेत. उद्धव ठाकरे पिंपराळा येथील मानराज पार्क मैदानात सभा देखील घेणार आहेत.
शरद पवारांनी बोलावली बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वायबी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्याने शरद पवार मतदारसंघ निहाय चाचपणी करणार आहेत.
मुंबईला पावसाचा यलो अलर्ट
संपूर्ण ऑगस्ट महिना विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईतही सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे आज मुंबईला यलो अलर्ट देण्यात आलाय. वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
[ad_2]