[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने यूएस ओपन २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचने न्यूयॉर्कमधील मार्गारेट कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात तृतिय मानांकित रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून २४वे ग्रँडस्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकावले. जोकोविचने पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. यानंतर दुसरा सेट जोकोविच आणि तृतिय मानांकित रशियाच्या मेदवेदेव यांच्यात एक तास ४४ मिनिटे चुरशीची लढत झाली. जोकोविचने हा सेट ७-६ ने जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने मेदवेदेवचा ६-३ असा पराभव करत विजय मिळवला. जोकोविच आतापर्यंत ३६ वेळा ग्लँड स्लॅम फायनल खेळला आहे. त्यापैकी २४ विजेतेपद त्याने पटकावलेत. तो १० वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन आणि सात वेळा विम्बल्डन चॅम्पियन ठरलाय. </p>
[ad_2]