[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
MH CET 2024 Updates: सीईटीच्या परीक्षेचं (CET Exams) वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा (MH CET 2024 Updates) 16 एप्रिल ते 2 मे या कालावधीत होणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची सीईटी ही सीईटी सेलतर्फे घेण्यात येते. त्यामुळे वेळापत्रक जाहीर झाल्यानं आता विद्यार्थीही परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.
पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक सामायिक प्रवेश परीक्षेचे (MHT CET) संभाव्य वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं (CET सेल) जाहीर केलं आहे. त्यानुसार अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा 16 एप्रिल ते 2 मे या कालावधीत होणार आहे. संभाव्य वेळापत्रक जाहीर झाल्यानं आता विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची सीईटी ही सीईटी सेलतर्फे घेण्यात येते. या सीईटीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश दिला जातो.
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलनं MAH MBA CET, MMS CET, MAH MCA CET, MHT CET, MAH LLB 5 Years CET, MAH B.Ed CET, MAH BHMCT CET, MAH BPlanning CET, MAH MPEd या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. MH Common Entrance Test नं जाहीर केल्या प्रमाणे या परीक्षा मार्च 2024 ते मे 2024 या कलावधीत घेण्यात येणार आहेत.
संपूर्ण संभाव्य वेळापत्रक विद्यार्थ्यांना MAH CET ची अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org वर पाहता येईल.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
[ad_2]