[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>इंग्लंड, मग पाकिस्तान आणि आता श्रीलंका…. अफगाणिस्ताननं तीन बलाढ्य प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवून यंदाचा विश्वचषक गाजवला आहे. पुण्यातल्या एमसीए स्टेडियमवरच्या सामन्यात अफगाणिस्ताननं श्रीलंकेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या प्रभावी आक्रमणासमोर श्रीलंकेचा अख्खा डाव २४१ धावांत आटोपला होता. अफगाणिस्तानकडून फाझल हक फारुखीनं चार आणि मुजीब उर रहमाननं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. अफगाणिस्तानचा रहमानउल्लाह गुरबाज भोपळाही फोडू शकला नाही. पण त्यानंतर अफगाणी फलंदाजांनी प्रत्येक विकेटसाठी भक्कम भागीदारी रचून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अफगाणिस्तानच्या इब्राहिम झादराननं ३९, रहमत शाहनं ६२, हशमत शाहिदीनं नाबाद ५८ आणि अझमत ओमरझाईनं नाबाद ७३ धावांची खेळी उभारली. अफगाणिस्ताननं तीन विजयांसह विश्वचषकाच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. </p>
[ad_2]
Afghanistan vs Sri Lanka : अफगाणिस्ताननं 3 बलाढ्य प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवून गाजवला विश्वचषक
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/10/e982cd641586ff086c96b8dd754de51b1698688834804308_original.jpg)