[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
जालना : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पोटच्या लेकानेच आपल्या वडिलांची हत्या (Murder) केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले होते. राहते घर विकण्यास वडिलांनी विरोध केल्याच्या किरकोळ कारणावरून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इब्राहीम खान मुबारक खान (वय 60 वर्ष, रा. अक्सा मशीद परिसर) असे मयत व्यक्तीचे नाव असून, शाहरुख इब्राहीम खान (वय 30 वर्ष) असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, किरकोळ कौटुंबीक वादातून मुलाने बापाचा डोक्यात लाकडी दाड्यांने जबर मारहाण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. जालना शहरातील गांधीनगर भागात सोमवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला आहे. इब्राहीम खान मुबारक खान असे मृताचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी मुलगा शाहरुख इब्राहीम खान यास ताब्यात घेतले आहे.
डोक्यात लाकडी दांड्याने वार
या घटनेविषयी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक असलेला शाहरुख इब्राहीम खान हा वडील इब्राहीम खान यांना राहते घर विकण्यास सांगत होता. मात्र, वडिलांचा यास विरोध होता. यातून बाप-लेकांमध्ये नेहमी वाद व्हायचे. आज दुपारी याच कारणावरून झालेल्या वादातून शाहरुख खान याने वडील इब्राहीम खान यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करून जखमी केले. त्यामुळे रक्तबंबाळ होऊन ते बेशुद्ध पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी पोलिसांची धाव…
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, सदर बाजार ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रशांत महाजन, उपनिरीक्षक नरोडे, महिला कर्मचारी फुलके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
बाप-लेकांमध्ये नेहमी वाद…
इब्राहीम खान हे जालना शहरातील गांधीनगर भागात राहतात. त्यांचा मुलगा शाहरुख रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. दरम्यान, मागील काही दिवसांपासून गांधीनगरमधील राहते घर विकण्याचा आग्रह शाहरुखने धरला होता. मात्र, घर विकायच्या भूमिकेवर इब्राहीम खान यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांत याच कारणावरून बाप-लेकांमध्ये नेहमी वाद होत असल्याचे पाहायला मिळायचे. दरम्यान, सोमवारी पुन्हा वाद झाले आणि वाद एवढ्या विकोपाला गेले की, शाहरुखने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यात लाकडी दाड्यांने जबर मारहाण केली. याच मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या:
ट्रॅक्टर खरेदी करण्यास विरोध, पत्नीची हत्या करून मृतदेह दोरीने बांधून लटकवून ठेवला; हिंगोली जिल्ह्यातील धक्कादायक घटना
[ad_2]