( प्रगत भारत । pragatbharat.com)
Horoscope 9 January 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी कुटुंबाकडे लक्ष द्याल आणि घरगुती खर्चाकडे लक्ष द्या. तुमच्या आवडीशी संबंधित कामात थोडा वेळ घालवला पाहिजे.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्यवसायाच्या उद्देशाने तुम्हाला प्रवासाची संधी मिळू शकेल.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी आयात-निर्यात संबंधित कामांमध्ये एक मोठा प्रकल्प आढळू शकतो. आजचा दिवस एक उत्कृष्ट दिवस आहे.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी येत्या काळात यश तुमच्यासोबत राहील. एखाद्या विश्वासू व्यक्तीबरोबर आपली समस्या शेअर केल्यास आपले मन हलके होईल.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी व्यावसायिकदृष्ट्या आपल्याला लोकप्रियता आणि प्रशंसा मिळेल. कोणत्याही सुंदर ठिकाणी भेट देऊन आनंद घेऊ शकता.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी घरात पाहुण्यांचे आगमन झाल्याने घराचे वातावरण सुखद राहील. आपल्या अवघड समस्यांचे निराकरण होईल.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना कामात फायदा होईल. आज घरात मोठी जबाबदारी मिळू शकते. तुम्ही हुशारी वापरून काम केले तर तुम्हाला त्यात यश मिळेल.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी तुमच्या मित्र आणि परिचितांसोबत चांगला वेळ घालवाल. नवीन मैत्री तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी नशीब खूप साथ देणार आहे. वागणुकीत बदल हा इतरांसाठी चर्चेचा विषय बनेल. तुमच्या घरात कोणतेही शुभ कार्य पूर्ण होईल.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी बुद्धिमत्ता आणि हुशारी दाखवून तुम्ही तुमची कामे सहज पूर्ण कराल. इतरांबरोबर मिळून केलेल्या कामातही चांगले लाभ होतील.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी कोर्टाशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावर वर्चस्व मिळू देणार नाही. मंगळवारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या लाभ मिळू शकतो.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )