[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई विद्यापीठात पदवी स्तरावर वाणिज्य (बी.कॉम) मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या अभ्यासक्रमाच्या 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या उन्हाळी सत्रातील सहाव्या सेमिस्टर परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
60,285 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, त्यापैकी 15,346 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर 24,701 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. एकूण निकालाची टक्केवारी 38.32 टक्के आहे. या परीक्षेला 3,069 विद्यार्थी गैरहजर राहिले आणि 285 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आल्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले. आतापर्यंत विद्यापीठाने विविध ५३ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिस्टन्स अँड ओपन स्टडीज (आयडॉल) च्या पदव्युत्तर द्वितीय वर्ष व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या (SYMMS) तिसऱ्या सत्राची परीक्षा 8 ते 17 जून या कालावधीत होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे.
अपुरे अभ्यास साहित्य आणि कामकाजाच्या दिवसांत परीक्षा होत असल्याने परीक्षा पुढे ढकलून सुट्टीच्या दिवशी घेण्याची मागणी युवासेनेसह विद्यार्थ्यांनी केली. या पार्श्वभूमीवर, काही तांत्रिक कारणांमुळे सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असून २९ जूनपासून सुरू होणार असल्याचे आयडॉलकडून स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा 18 जुलैपासून सुरू होणार
[ad_2]