daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 19 January 2024

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 19 January 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी नशिबाच्या मदतीने तुम्ही काही मोठे यश मिळवू शकता. स्वतःवरील कामाचा भार कोणाशी तरी शेअर केल्याने तुम्हाला थोडे हलके वाटेल.

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी  उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्याने आर्थिक परिस्थितीची समस्या दूर होईल. कोणताही वाद लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा.  

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी वैयक्तिक कामापेक्षा व्यावहारिक कामात जास्त रस राहील. मालमत्तेची कोणतीही माहिती गोपनीय ठेवणे फार महत्वाचे आहे.

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी कामाशी संबंधित चांगल्या आणि व्यावहारिक कल्पना तुमच्या मनात येतील. काही लोक कुटुंबात आपला मुद्दा सिद्ध करण्यास उत्सुक असतील. 

सिंह (Leo)

आजच्या दिवशी घर बांधण्याची किंवा खरेदी करण्याची तयारी सुरू करू शकता. कोणत्याही नवीन बदलासाठी स्वतःला तयार करा.

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ किंवा भेटवस्तू मिळू शकते. आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यास उत्सुक राहाल.

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना कोणत्याही कौटुंबिक बाबींवर ताबा ठेवावा लागेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात तुम्हाला अडचण येईल. 

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी आर्थिकदृष्ट्या स्वतःला मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करा.  हुशारीने काम करा, अडचणी सोप्या होतील.

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी गुंतवणूक भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहणार आहे. 

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी व्यवसायात अनुकूल लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी काळ कठीण असू शकतो. 

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी बराच काळ रखडलं काम पूर्ण होईल. व्यापारी वर्गासाठी दिवस चांगला जाणार आहे.  

मीन (Pisces)

आजच्या दिवशी तुमची कामाच्या ठिकाणी प्रशंसा होणार आहे. प्रॉपर्टी डीलचे निर्णय तुमच्या बाजूने असू शकतात. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts