Yavatmal Crime News postman beaten with a baseball stick by Two unidentified persons maharashtra marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

यवतमाळ: रस्त्यावरील कार बाजूला घेण्याच्या किरकोळ वादातून एका डाकसेवकाला जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आला आहे.  दोन अज्ञात हल्लेखोराने बेसबॉल स्टीकने प्रहार करून डाकसेवकाच्या डोक्याला गंभीर इजा केली आहे. ही भयावह घटना यवतमाळच्या (Yavatmal Crime) वीर सावरकर चौक परिसरात रविवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी डाकसेवकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोघाविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांनी (Yavatmal Police) खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

डोक्यावर बेसबॉल स्टिकने हल्ला केला 

राहुल रमेश कराळे (राहणार दुबे ले आऊट, जुना उमरसरा,यवतमाळ) असे जखमी डाकसेवकाची नाव आहे. तो गिलाणी नगर येथील उप. डाकघरात कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी राहुल त्याच्या कारमधून (एमएच 29 बीव्ही 9739) दाते कॉलेज चौकाकडून आर्णी रोडकडे जात होता. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या दोघांनी वाहन आडवे लावून राहुल सोबत वाद घातला. त्यानंतर राहुल आणि अज्ञात दोघे राहुलला शिवीगाळ करत त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.

दरम्यान, त्यातील एकाने कारमधील बेसबॉल स्टीकने राहुलच्या डोक्यावर प्रहार केला. ज्यामध्ये राहुल गंभीर जखमी झाला आहे. सध्या राहुलला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, त्याच्या डोक्याची कवटी फुटल्याचे सांगण्यात आले आहे. राहुलची प्रकृती सध्या गंभीर असून याप्रकरणी मंगळवारी 24 जानेवारीला रमेश कराळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहे. 

घटना सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद

या घटनेत मारहाण केल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. या व्हीडिओच्या साह्याने पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. मात्र केवळ किरकोळ कारणावरून डाकसेवक राहुलला केलेल्या जबर मारहानीमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

वर्षभरात एकूण दीडशे आरोपी ‘मोस्ट वाँटेड  लिस्टमध्ये 

गेल्या वर्षभरात यवतमाळ जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र आहे. सतत गुन्हेगारी कारवाया करणारे आणि नंतर पसार होणारे आरोपी संख्येने अधिक आहेत. या आरोपींची मागील वर्षीपेक्षा यंदा संख्या वाढली आहे. एकूणच गुन्हे वाढत असल्याने आरोपींचा सहभागी त्यात वाढत असल्याचे दिसून येते. वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान सध्या पोलीसांपुढे  उभे ठाकले आहे मागील वर्षभरात एकूण दीडशे आरोपी ‘मोस्ट वाँटेड’च्या लिस्टमध्ये आहे. त्यापैकी 45 आरोपी मिळाले असून,95 जणांचा अजूनही शोध सुरू आहे. फरार आरोपींचीही स्थिती अशीच आहे. त्यावरही विशेष काम पोलिसांकडून केले जात आहे. यात कितपत यश येते, हे कायदा व सुव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts