Crime News, लव्ह जिहाद?; ओळख लपवून केला अत्याचार, विरोधानंतर दिली धमकी, तरुणीशी घाणेरडे कृत्य करणारा अटकेत – a person in delhi arrested for alleged rape and giving threat to 22 year old girl in delhi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : दिल्लीतील करावल नगर भागातील एका २२ वर्षीय तरुणीवर कथित बलात्कार करून तिला धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीने आपली ओळख लपवून ही घटना घडवून आणल्याचा आरोप आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेने शुक्रवारी करावल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पीडितेचा आरोप आहे की की शाहरुख नावाच्या एका व्यक्तीने ऑक्टोबर २०२० मध्ये तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले आणि त्याची ओळख लपवून ठेवली. या प्रकरणाबाबत माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, या वर्षी जानेवारीमध्ये जेव्हा मुलीला त्याच्या धर्माची माहिती मिळाली तेव्हा तिने संबंध संपवण्याचा प्रयत्न केला.

Gold Price Today : सोने २५०० रुपयांनी स्वस्त झाले, सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे का?, तज्ज्ञ काय म्हणतात
ओळख लपवून गुप्तपणे अश्लील फोटो काढले

पोलिसांनी सांगितले की, शाहरुखने मुलीच्या नकळत व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलद्वारे तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले होते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची धमकी देऊन संबंध सुरू ठेवण्यासाठी त्याने तिच्यावर दबाव टाकला. करवल नगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

साक्षी मलिकचा सरकारला अल्टिमेटम, म्हणाली, आशियाई क्रीडा स्पर्धेत तेव्हाच जाईन, जेव्हा…
या प्रकरणी आरोपीला अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी सीलमपूर भागातील एका टेलरिंगच्या दुकानात काम करतो आणि आपला हेतू पूर्ण करण्यासाठी त्याने ओळख लपवून मुलीशी मैत्री केली होती.

हे लव्ह जिहादचे प्रकरण आहे का?

हा लव्ह जिहादचे प्रकरण आहे का का, असा प्रश्नही या प्रकरणी उपस्थित केला जात आहे. दिल्ली पोलिसांनी मात्र हे लव्ह जिहादचे प्रकरण नसल्याचे स्पष्ट केले. लव्ह जिहाद हा शब्द सर्वप्रथम भाजप नेत्यांनी वापरला होता. देशाच्या अनेक भागात लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.
Sharad Pawar: सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष का केले?, शरद पवार यांनी सांगितले कारण

[ad_2]

Related posts