chitra wagh on baramati lok sabha election supriya sule vs sunetra pawar maharashtra politics marathi news 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदनगर: बारामतीमध्ये (Baramati Lok Sabh Election) जर सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) अशी लढत झाली तर सुनेत्रा पवार या निवडून येतील असं भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी म्हटलं आहे. भाजपने पवारांचे घर फोडले अशी टीका शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून केली जाते, यावर बोलताना पेरणार तेच उगवणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

जर भाजपला ओबीसींची एवढीच काळजी असती तर पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असती, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंकजा मुंडे यांचं राजकारण संपवलं जात असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली होती. यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, सटर फटर गोष्टींवर विचारत जाऊ नका, पंकजा मुंडे या आमच्या नेत्या आहेत आणि त्यांना केंद्रामध्ये महत्वाची जबाबदारी पक्षाने दिली आहे. माझ्या उमेदवारीबाबत म्हणाल तर मी काम करत आहे. भाजपने ज्यांना ज्यांना राज्यसभेवर घेतलं ते प्रत्येक जण उत्तम काम करत आहेत. भाजपने ज्यांची ज्यांची निवड केली ते पक्षाचे हाडाचे कार्यकर्ता आहेत. 

बारामतीमध्ये नणंद भावजय यांच्यात थेट लढत शक्य

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात गाठीभेठी घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे विद्यमान खासदार सुप्रिया सुळेही  पायाला भिंगरी बांधल्यासारखं मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यामुळे बारामतीमध्ये नणंद भावजय असा मुकाबला होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

पवार विरुद्ध पवार 

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात  कोण असणार याची चर्चा सुरू आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याचे चर्चा जोर धरत असतानाच रोहित पवारांनी देखील अजित पवारांच्या कुटुंबातीलच उमेदवार असू शकतो अशी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे बारमातीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगेल, अशीच शक्यता वर्तवण्यात येतेय. 

गेल्या काही दिवसापासून सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत. त्यांनी दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानी भेट दिली. तसेच हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना भेटत आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार उमेदवार असतील अशी चर्चा जोर धरते आहे.  

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts